धर्म साहित्य आणि मानवता
पुणे : '' सर्व धर्म एक असून सर्व धर्मांचा केंद्रबिंदू मानव आहे. मानव कल्याणासाठी शाश्वत साहित्याची गरज आहे. संस्कृतीमधील एकता मानवतेला पुण्यशील ठरावी, यासाठी साहित्यनिर्मिती होत असते. "
इति डॉ. श्रीपालजी सबनीस.
यात वक्त्याने 2 गोष्टी घेतल्या आहेत.
१. धर्म आणि २. साहित्य या दोन्हीतून मानवतेची जोपासना व्हावी यावर भर दिला आहे.
मला वाटते की यासाठी कृती कार्यक्रम म्हणून सर्वप्रथम आपण जे धर्म मानणारे लोक आहोत, तसेच जे साहित्यिक किंवा वाचक आहेत; या आपण सर्वांनी आपल्या अंगी मानवतेचे गुण बाणायला हवेत. आणि simultaneously इतरांनाही आवाहन करायला हवे. की बाबांनो आणि बायांनो ह्या मार्गानेच खरे सुख मिळेल. पैसा प्रसिद्धी जरी कितीही मिळाली तरी गैर मार्गाने असेल तर दुःखच आणणार. दुसऱ्याला त्रास दिला की आपल्याला पण होणारच. म्हणून मानवतेचा मार्ग धरूया. 🙏
Comments