Posts

Showing posts with the label जग

आतंकी हल्ला जातीय तेढ आणि भारत

Image
■ पुलवामा नंतर नुकताच दिल्लीमध्ये मोठा आतंकी हल्ला होऊन दहाच्या वर मानवांची निर्घृण हत्या झाली.  ही गोष्ट खूप संताप जनक आहे आणि त्याचा मी निषेध करीत आहे. ही कृत्य शिकल्या सवरलेल्या भारतातील मुसलमानांकडून झाली यामुळे अधिक संताप येणे स्वाभाविक आहे.  या पार्श्वभूमीवर गेले बरेच दिवस दोन्ही बाजूंनी भयंकर समूह द्वेष व टोकाचे विचार आतून उकळताना दिसत आहेत हे एक मोठे गंभीर गोष्ट ध्यानात येत आहे. म्हणूनच आज आपल्याशी हा संवाद साधत आहे. ● केवळ संताप होऊन व एकमेकांवर नाराजी व्यक्त करून काम होणार नाही. यामागे असणारी मूळ कारणे शोधली व त्यावर उपाय केला तर ते जास्ती परिणामकारक ठरेल असे मला वाटते म्हणून हा लेखन प्रपंच. ● विविध धर्मांची रचना माणसाला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी झाली हे खरे असले तरी सर्व धर्म सारखे नाहीत. जशी हाताची पाच बोटे भिन्न तसे वेगवेगळे धर्म ही भिन्न. अत्यंत पुरातन काळापासून अस्तित्वात आलेले हे धर्म असल्याने त्यांच्यात काही गुण व काही दोषही आहेत. धर्मचिकित्सा करून गुण वाढवायचे व दोष कमी करायचे हे आता आपणा सर्वांच्या हाती आहे. ● इस्लाम हा एक धर्म आहे आणि त्यात काही चांगल्य...

अनुभव के कुछ अल्फाज़ बयान कर रहा हूँ ।

Image
■ 1 ~ Photography & Words ki creativity के आधार पर ~ अनुभव के कुछ अल्फाज़ बयान कर रहा हूँ l  अच्छा लगे तो शेअर जरूर करें l 📱 ■ 2 ~ किसका व्यवहार कैसा है यह हमे समजता नही ऐसी तो कोई बात नही । फिर भी हम प्यार से पेश आते है इसका ये मतलब नही के हम भोले भाले है । यह है कि हम रिश्ता निभाना चाहते है ।  फिर भी आप ना चाहो तो दूरी ही सही । 🫎 ■ 3~ जब साथ छुटता है तो दर्द तो होता है ।   कभी किसी प्यारे दुलारे को भगवान उठा लेते है ।  ● तो कभी कोई अपने ही हमारा फायदा उठा के चले जाते है ।  दर्द तो होता है; पर फिर भी हमे आगे तो चलना ही चलना है । 📌 ■ 4 ~ Sex is integral, essential and very lovely part of life. [ Sex as in love, romance, physical relation, thinking of it or watching movies etc... everything. ] Kamal exciting Unless it takes toll on your body mind and brain. That toll could be heavy to very heavy.  Be cautious while enjoying it by any means. 🪷 आपका अपना; डॉ. प्रसाद फाटक पुणे  9822697288

मानवतेला देव, धर्म यांची पूर्व अट नाही.

Image
     सहज एक आठवण सांगत आहे -  ● शिकागो च्या Flight वर मला एक पोलंडचा नागरिक भेटला होता. तो नास्तिक आहे. त्याने असे म्हटले की; माणुसकीने वागण्यासाठी मला कुठल्याही देवाची, धर्माची गरज नाही. देव, धर्म हे माणसाला चांगल्या मार्गावर आणतात हे ठीक आहे. पण काही वेळा वाद आणि भांडणाला निमित्त होऊन बसतात. ● धार्मिक, नास्तिक, निधर्मी, ex muslims, कम्युनिस्ट ...अशा सगळ्यांपर्यंत माणुसकीचा विषय पोहोचवण्यासाठी जर नीट खटपट करायची असेल; तर असे विचार मांडले पाहिजेत की ज्यामध्ये देव धर्म राष्ट्र याची गरज पडणार नाही. Right? ● जग शांततेत राहण्यासाठी आणि माणसाची माणुसकी वाढण्यासाठी कृण्वन्तो विश्वं अर्यम्, islamization of world अशा कुठल्याही slogans ची गरज नाही. ती कदाचित दुसऱ्याला आपल्यामध्ये ओढण्याची वाक्य देखील ठरू शकतात आणि त्यामुळे संघर्ष होऊन माणुसकीला हानीच पोचू शकते. आपापल्या धर्मात रहा, त्याचे पालन करा आणि धर्मात जी दुसऱ्यावर आक्रमणाची शिकवणूक असेल ती काढून टाका. पुढच्या पिढीला एक अधिक चांगलं जग देण्यासाठी हे उपयोगी ठरेल. पोलंड च्या माणसाशी बोलत असताना iceland चे मनमोहक द्रुष्य दि...

समविचारी सेलिब्रिटी.

Image
● प्रियजन हो, यातला जो पहिला फोटो आहे तो मंचाचा विचार थोडक्यात मांडणार्या पॅम्प्लेट चा आहे.  ● दुसरा जो आहे तो बराक ओबामा च्या नव्या पुस्तकाच्या प्रिफेस मध्ये व्यक्त केलेला विचार आहे. ● ओबामा असे म्हणतो की, आता जग छोटे झाले आहे त्याच्या पुढील समस्या अफाट आहेत. आपण एकमेकांच्या संपर्कात येणारच आहोत; तर आपण सगळ्यांनी एकत्र राहण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. अन्यथा आपण नष्ट होऊ.

हिंदुत्वाचे वारे की वावटळ?

Image
हिंदुत्वाचे वारे की वावटळ? ■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.  ● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते. ● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे. ● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे. हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे....

शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. माणूसपण 30.

Image
● शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. १. व्यक्तीने केलेली विविध गुन्ह्यांमधील अमानवी स्वार्थी कृत्ये. २. नवीन साम्राज्यवाद किंवा माझ्या धर्मांच्या सत्तेखालील जग अथवा अनैतिक युद्धांद्वारे इतरांचे शोषण किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी गट, देश किंवा धर्म यांनी केलेल्या  आक्रमक कृती.  ● या अमानुष गोष्टी जगातील शांतता आणि समृद्धीला धक्का पोहोचवतात.  म्हणूनच -   ● आपण ' मानवता ' तसेच ' जगा आणि जगू द्या ' हे धोरण स्वीकारले पाहिजे. तेच सर्वांसाठी चांगले आहे.  चला, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक नवीन जग निर्माण करूया.

भारताबाहेरील जगासंबंधी पुस्तकांचे वाचन आवश्यक ?

आपण प्रत्येकानेच - वेगवेगळ्या प्रकारचे सगळीकडील साहित्य वाचावे - ही विनंती.    मगच आपले मत बनवावे.   माझे वाचन अतिशय मर्यादित आहे; पण तरीही बाहेरचे जे थोडाफार वाचले ते असे _ ●१ ब्रिटिश : 1812 व 1885 सालातील ब्रिटिश संस्कृती संबंधित माहिती देणारी 3 पुस्तके - सेन्स अँड सन्सिबिलिटी, प्राइड अँड प्रिजुडीस, पोर्टेट ऑफ अ लेडी ही पुस्तकं वाचली आहेत. ●२ अमेरिकन : चार्ली चैप्लिन, अब्राहम लिंकन व एक होता कार्व्हर चे चरित्र वाचले आहे.  शांता शेळके अनुवादित चारचौघी हे अमेरिकन जीवन व संस्कारक्षम माते संबंधीचे पुस्तक वाचले आहे. ●३ अफगाणिस्तान : तेथे जन्मलेल्या व अनुभूती घेतलेल्या मुलाचे चरित्रात्मक वाटणारे किंवा वास्तवास धरून असलेले द काईट रनर वाचले आहे.  नॉट विदाऊट माय डॉटर वाचले आहे. ●४ पोलंड  : डायरी ऑफ अ यंग लेडी हे जर्मन / पोलंड येथील कु. आना फ्रेंक हीचे पुस्तक वाचले आहे. ●५ रशिया : येथील क्रांतीसंबंधी कार्यकर्ता परिचय असणारे मॅक्झिम गॉर्की हे वाचले आहे व त्याचे आई हे कादंबरी वाचली आहे. ●६   कुराण व बायबल थोड्या प्रमाणात वाचले आहे.  😇 आणि इतर का...