Posts

Showing posts with the label goa

Ganabab

Image
गणाबाब तेव्हा माझ्यापेक्षा जवळजवळ ३५ एक वर्षांनी मोठे होते. तसं म्हंटलं तर मराठीत त्यांचा अहो जाहो असा उल्लेख करावा लागतो आहे. पण आमच्या कोकणीत मात्र माणूस कितीही मोठा असला तरी त्याचा उल्लेख एकेरीतच केला जातो. त्या भाषेत त्यामुळे एक वेगळीच आपुलकी, समानता वगैरे असावी असे वाटू लागते. संघाकडे काही लोकं विनामुल्य काम करणारे लोकं असतात त्यांना प्रचारक म्हणतात. हे लोकं निस्वार्थ पणे देशसेवेसाठी घर सोडतात. मी आपला १/ १.५ वर्षच घर सोडून प्रचारक म्हणून गेलो आणि मला गोव्यात पाठवण्यात आले. तिथे वाल्पोई हे अगदी स्वप्नातले गाव असेच म्हणता येईल असे एक गाव आहे तिथे मला ठेवले होते. आणि इथेच गणाबाबशी माझी पहिली ओळख झाली.शांतादुर्गेच्या शाळे जवळ एक शाखा होती. त्या शाखेत मला कोणीतरी घेवून गेलं.तो परिसर इतका नयनरम्य होता कि माझ्या आनंदाला पारावर उरला न्हवता! सगळीकडे नुसतं हिरवेगार, एकीकडे डोंगर, दुसरीकडे उतारावर नारळ पोफळीच्या वाड्या, अशातच डोंगरावरून येणारे छोटे अवखळ झरे! शाखा सुटायच्या अगदी पाच मिनिट आधी एक वयस्कर व्यक्ती वय असेल ६० च्या आसपास, हळूहळू चालत आत येताना मला दिसली. बुटकी असून ती...