Posts

Showing posts with the label मंदिर

स्त्री सौंदर्य आणि सनातन धर्म.

Image
■ रश्मिका मंदाना हिचा एक अतिशय सुंदर व सोज्वळ फोटो मी मित्रांच्या ग्रुप वर पोस्ट केला होता. त्यावर एका मित्राने असे म्हटले की, " प्रसाद भटा तू वेदांचे महत्व सांगतोस आणि असे फोटो कसे बरे टाकतोस? " ☆ त्यामुळे मला रागवण्याचे काहीच कारण नाही. उलट असे इतरांच्या मनात आले असू शकते. म्हणूनच एक विचारसरणी अधिक स्पष्ट करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. आणि काही मुद्दे मांडतोय. 🫳 ■ वेद हे प्रत्येक सनातनी व्यक्तीला 4 आश्रमांप्रमाणे कर्म करण्यास सांगतात. चार आश्रम असे आहेत - ब्रह्मचर्य गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. गृहस्थ जीवनात उत्तम धनप्राप्त्ती , शृंगार, प्रजोत्पादन आदि कर्तव्ये दिलेली आहेत. ☆ वेद हे 4 पुरुषार्थ परिपूर्ण करण्यास सांगतात. ते असे - धर्म, अर्थ, काम व मोक्ष . ..धर्म व मोक्ष यांच्या 2 तीरां मध्ये अर्थ व काम योग्य रीत्या वाहिले की मग त्यास प्रत्यवाय नाही असेही सांगितले आहे. [ आयुर्वेद हा आहे; त्या 4 हि पुरुषार्थाचे मूळ म्हणजे आरोग्य सांभाळणारा उपवेद. ] ● आपल्याकडे मंदिरामध्ये अत्यंत सुंदर स्त्रियांची उत्तम शिल्पे आहेत. खजुराहो येथील मंदिरातील ' का...

हिंदू धर्म टिकवणे.

Image
आपल्या दृष्टीने एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे हिंदूधर्म टिकवणे. त्यासाठी काय काय करावे लागेल? ते करत असताना भाग एक म्हणजे हिंदू संघटन, भाग दोन हिंदू अभिमानाने राहणे, भाग तीन आक्रमणाच्या खुणा मिटवणे. आणि हे सगळं डॉक्टर हेडगेवार यांच्यापासून आता मोहनराव, मोदीजीपर्यंत सगळ्यांनी केले. त्यात आपलाही सहभाग राहिला आहे. संघटन, शक्ती व राजकीय विजय त्या माध्यमातून झालेल्या अनेक कृती या सगळ्यातून बरेच काही फलित आपल्या हाती आले आहे नक्कीच.  आताचा नवा मुद्दा असा आहे की आपण आपल्या डोक्यात ' सिविल वाॅर चा / धर्मयुद्धाचा एक शेवटचा ठोका ' हे घेऊन बसलो आहोत का? तसे असेल तर मात्र आपण थोडसं चुकतोय. हा टप्पा समोरून जर आला तरच या अर्थाने घेण्यास योग्य. पण तो आपल्या डोक्यातला असता कामा नये. कृष्णा नीती या नावाखाली आपण काही भ्रामक कल्पना मनात बाळगून आहोत आणि त्यामुळेच आपण महाभारताप्रमाणे ह्या धर्मयुद्धाची कल्पना करीत आहोत. परंतु कृष्ण निती ला बरेच कांगोरे होते त्यात कृष्णशिष्टाई होती त्यात दृष्टांचा संहार होता सरसकट गल्लीबोळातील युद्ध किंवा नागरी लोकांवर हल्ला असे नव्हते. किंवा कोणीही का...

कलशारोहणं

Image
राजा केळकर संग्रहालयासमोर शिव मंदिराचा जिर्णोद्धार झाला त्याच्या कलश आरोहणाचा दिमाखदार सोहळा आज पार पडला. धार्मिक भाव व भगवा रंग याने वातावरण प्रफुल्लित झाले. हर हर महादेव सांब सदाशिव शंभो हर. 🕉️🚩🚩