Posts

Showing posts with the label ईश्वर

The God particle. ईश्वर तत्त्व.

Image
The God particle.  ईश्वर वस्तु... आता इथे ईश्वर वस्तु असा शब्द वापरल्यामुळे काही जण नाराज होतील. परंतु खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी हा शब्द वापरलेला आहे. विषय वस्तु म्हणजे या जगातील सर्व भौतिक गोष्टी तर ईश्वर वस्तु म्हणजे ते परब्रम्ह परमात्मा चैतन्य असा विषय आहे. आज जगामध्ये अनेक लोक वेगाने नास्तिक होत आहेत. मुसलमानांना नास्तिक होणं सोपं आणि सोयीस्कर नसल्यामुळे ते एक्स मुस्लिम होत आहेत. या पार्श्वभूमीवर या ईश्वर वस्तु बद्दल बोलणं योग्य राहील. अर्थात जर कोणी नास्तिक असेल तर काही अडचण नाही. तो त्याचा विचार आहे. त्याला मी काही पाखंडी म्हणत नाही. मी त्याच्याविरुद्ध काही कमी अधिक करायची इच्छा ठेवत नाही. माझ्यासारख्या अनेकांशी जो ईश्वराचा संबंध येतो तो कशासाठी आहे? आणि त्याचा उपयोग काय आहे? एवढंच फक्त मी आपल्यासमोर ठेवणार आहे. काहींच्या मते ईश्वर हे अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मानवाची कल्पना आहे. तर काहींच्या मध्ये ध्यानावस्थेत सापडलेले ते एक तत्त्व आहे. अर्थात या दोन्हीपैकी काहीही असलं तरी फारसा फरक पडत नाही. कारण ती एक कल्पना आहे असं मानायला जागा आहेच. आणि तो अनेकांचा प्रत्यक्ष अन...

ईश्वराची लीला अफाट त्याचा पसारा अफाट.

■ अरेच्चा केवढेसे चिमुकले आहोत आपण... आणि अहंकार तर केवढा मोठ्ठा ⁉️ [ 👇ही पोस्ट निसर्ग फक्त सौंदर्य दाखवण्यासाठी नाही तर एका विचारासाठी आहे ] ● " जसं जसं आपण आकाशात उंच उंच जातो तसं तसं आपलं जे खालचं अस्तित्व आहे ते आणखी आणखी छोटं होत जातं. केवढे टिल्लू पिल्लू आहोत आपण❗️ विमानाचे हजार फूट आणि आणखीन काही हजार फूट एवढ्या अंतरावरून आपलं अस्तित्व इतकं छोटं असल्याचे कळत जातंय तर या जगाच्या अफाट पसाऱ्यात आपण असून नसून सारखेच आहोत नाही का? " ● ■ एवढंसं आपलं अस्तित्व आणि केवढा मोठा अहंकार ❓️ तो मात्र आभाळभर होत चाललाय. उलटंच आहे की हे! अस्तित्व चिमूटभर अहंकार आकाशभर अशी आपली परिस्थिती होत आहे ‼️