मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.
मानवतेची महागाथा मला उमजलेली मानवता आपल्यासमोर मांडत आहे. हे माझ्या अल्प बुद्धी ला सुचलेले विचार आहेत. आपण यावर विचार करा व पटेल तेव्हढे स्वीकारा व पसरावा. जे पटले नाही ते सोडून द्या. सर्वांचे सर्व मुद्यांवर संपूर्ण एकमत कधी होत नसते. नवरा बायको आई मुलगा यांचे देखील होत नसते. इतरांची तर काय कथा ? हे विचार कसे व कुठून आले त्याची पूर्व पिठीका : मी खूप वेळा बोलत असतो, तशी माझी दोन मने देखील कधी कधी आपसात बोलत असतात ! असाच एक संवाद प्रकट करतोय. मन १ व मन २ अशी सोप्पी नावे देतोय त्यांना. ... मन १ - तुला आठवतं का ? मन २ - काय रे ? मन १ - बरोबर ४६ वर्ष झाली तू एका बाईंच्या अन्यायाची तक्रार घेऊन शाळेचे सुपरवायझर श्री. कुलकर्णी सरांकडे गेलास तेव्हा ते काय म्हणाले ? मन २ - आठवतंय की. ते म्हणाले की तुझी तक्रार नंतर सांग. पण आधी तू काय आहेस ते बघ ? तू काय तुकारामाचा अवतार लागून गेलास काय ? ...