सर्वांसाठी सुखाचा एक मार्ग.
तर दोन गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.
1. 🕉 अद्वैत तत्त्वज्ञान : परब्रम्ह हे सर्व एकच आहे ते पाचही महाभुतांना व्यापून दशांगुळे उरले आहे असे म्हणतात. म्हणजेच ते सगळ्या यूनिवर्स पेक्षा जास्त काही व्यापून आहे.
त्यामुळे पांच महाभुते किंवा ज्याला भौतिक जग म्हणतात किंवा हे सगळे आपण प्राणी, वनस्पती, दगड, धोंडे, आकाश, सूर्य, तारे 🐯🐋🌞🍎🍔
वगैरे ते सर्व काही परब्रम्हाचा च भाग आहे.
दोन असे काहीही मानत नाहीत ती मनाची बुद्धीची स्थिती अत्यंत अवघड आहे.
म्हणून दुसरे आहे -
२.🌍 द्वैत तत्त्वज्ञान : त्यात भौतिक जग व परब्रम्ह असे दोन स्वतंत्र भाग मानले जातात.
जीवनातील सुखासंबंधी बोलायचे झाले तर
१. 🔯 या पाच महाभूतांची गरज नसलेले आपले आपण मिळणारे सुख किंवा त्यालाच शून्यातील सुख किंवा परब्रम्हाचे सुख.
२. 🍇 शरीरासंबंधीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पंचमहाभूते यांचे भौतिक सुख.
असे दोन भाग होतात.
🍓 आपण जेवढे भौतिक सुखात लिप्त होऊ तेवढ्याच दुःखांचा देखील सामना करावा लागू शकतो तसेच त्या सुखाला मर्यादा देखील असतात; म्हणून झिरो चे / परब्रम्हा चे सुख देखील रोज अनुभवावे असे म्हटले जाते.
ते भगवंताचे ज्ञान, भक्ती, ध्यान व योग मार्गातून मिळवावे लागते.
🧎♂️माझ्या सारख्याचे अद्वैत सुख / परब्रम्ह अनुभूती घेणे थोडा वेळच असते.
प्रत्येकाने ते थोडा वेळ घेतले असता त्याचा स्वतःचा फायदाच होईल.
अति प्रमाणात घेतलेला भौतिक सुखाचा हव्यास हा नंतर 😣 त्रासदायक / कष्टदायक होऊ शकतो.
🌟 ईश्वराच्या आठवणी मध्ये वेळ घालवण्यामुळे त्याला लगाम बसेल व आयुष्यात संतुलन येईल व सुखही मिळेल
असा जाणकारांचा विचार आहे.
🥳 जगत भी है, उसका सुख भी सही है ।
और
🙌 भगवंत भी है, उसका ग्यान व सुख भी जरुरी है ।
असे सुचवावेसे वाटते. धन्यवाद जी.
आपला डॉक्टर प्रसाद फाटक पुणे.
Comments