Posts

Showing posts with the label शांतता

मानवता शिकवणारे गीता व ज्ञानेश्वरी

Image
गीता आणि ज्ञानेश्वरीचा हिंदूधर्म सर्वां बद्दल एकत्व बाळगणारा, अत्यंत लवचिक, विश्वबंधुत्व शिकवणारा हव्यासाला टाटा बाय-बाय करायला शिकवणारा व सर्वांचे सुख बघणारा आणि म्हणूनच मानवतेची शिकवण देणारा आहे. शिवाय गरज असेल तेंव्हा यानुसार शिक्षा आणि केवळ खलनिर्दालन साठी युद्ध हेही शिकवतो.  हे सगळं आपण आपल्या धर्माची तत्वे न्हवे तर मूलतत्वे म्हणून, मानवता जगा पर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यातूनच जगात शांतता व समृद्धी एकत्र नांदेल.

समविचारी सेलिब्रिटी.

Image
● प्रियजन हो, यातला जो पहिला फोटो आहे तो मंचाचा विचार थोडक्यात मांडणार्या पॅम्प्लेट चा आहे.  ● दुसरा जो आहे तो बराक ओबामा च्या नव्या पुस्तकाच्या प्रिफेस मध्ये व्यक्त केलेला विचार आहे. ● ओबामा असे म्हणतो की, आता जग छोटे झाले आहे त्याच्या पुढील समस्या अफाट आहेत. आपण एकमेकांच्या संपर्कात येणारच आहोत; तर आपण सगळ्यांनी एकत्र राहण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. अन्यथा आपण नष्ट होऊ.

हिंदुत्वाचे वारे की वावटळ?

Image
हिंदुत्वाचे वारे की वावटळ? ■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.  ● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते. ● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे. ● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे. हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे....

शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. माणूसपण 30.

Image
● शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. १. व्यक्तीने केलेली विविध गुन्ह्यांमधील अमानवी स्वार्थी कृत्ये. २. नवीन साम्राज्यवाद किंवा माझ्या धर्मांच्या सत्तेखालील जग अथवा अनैतिक युद्धांद्वारे इतरांचे शोषण किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी गट, देश किंवा धर्म यांनी केलेल्या  आक्रमक कृती.  ● या अमानुष गोष्टी जगातील शांतता आणि समृद्धीला धक्का पोहोचवतात.  म्हणूनच -   ● आपण ' मानवता ' तसेच ' जगा आणि जगू द्या ' हे धोरण स्वीकारले पाहिजे. तेच सर्वांसाठी चांगले आहे.  चला, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक नवीन जग निर्माण करूया.

मानवता के विचार संग्रह हिन्दी ...मानवता thoughts compilation in Hindi

Image
1 विश्व की सारी समस्या अति स्वार्थ बुद्धि से दूसरों को तकलीफ देना और उनका शोषण करना । इस कारण सारी समस्या पैदा हुई है । उसका एकमात्र जवाब मानवता है - जो सिखाता है कि दूसरों को तकलीफ नहीं देना है । दूसरों का शोषण नहीं करना है । दूसरों के ऊपर अनैतिक दबाव नहीं बनाना है । इसलिए मानवता सभी धर्मों से ऊपर है। उलटा मानवता ही वह कारण है जिसके कारण धर्मों का निर्माण हुआ।  देखें कैसे:  ■ शुरुआती दौर में हम जानवरों की तरह ही रह रहे थे। फिर हम अपने मस्तिष्क, भावनाओं और विचारों के कारण बड़े होने लगे। हम चाहते थे कि हम बेहतर इंसान बनें। कोई भी दूसरा जानवर बेहतर कुत्ता या बेहतर चिडिया बनने के बारे में नहीं सोचता! इसके विपरीत मनुष्य स्वार्थी उद्देश्यों के कारण कभी-कभी हम जानवरों से भी बदतर हो जाते हैं।  ■ दोनों कारणों से मानवता के विचार / आचार की आवश्यकता हुई । अलग-अलग संस्कृतियों और अलग-अलग धर्मों ने लोगों को बेहतर इंसान बनाने का काम अपने हाथ में लिया। तो इसमें सबसे पहले क्या आया है यह स्पष्ट है! कुछ धर्म इस काम में बेहतर हो सकते हैं और कुछ नहीं।  ■ इसलिए इस बात की पूरी संभावना है...