Posts

Showing posts with the label सत्य

समविचारी सेलिब्रिटी.

Image
● प्रियजन हो, यातला जो पहिला फोटो आहे तो मंचाचा विचार थोडक्यात मांडणार्या पॅम्प्लेट चा आहे.  ● दुसरा जो आहे तो बराक ओबामा च्या नव्या पुस्तकाच्या प्रिफेस मध्ये व्यक्त केलेला विचार आहे. ● ओबामा असे म्हणतो की, आता जग छोटे झाले आहे त्याच्या पुढील समस्या अफाट आहेत. आपण एकमेकांच्या संपर्कात येणारच आहोत; तर आपण सगळ्यांनी एकत्र राहण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. अन्यथा आपण नष्ट होऊ.

हिंदुत्वाचे वारे की वावटळ?

Image
हिंदुत्वाचे वारे की वावटळ? ■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.  ● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते. ● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे. ● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे. हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे....

गणेश प्रतिष्ठापना का गूढार्थ |

Image
श्री. गणपती प्रतिष्ठापना करताना जाणवते की आपल्या कडे परब्रम्ह परमात्मा यासंबंधी जे प्रचंड व्यापक विचार आहेत ते अत्यंत सोप्या पद्धतीने आपण एका पार्थिव मूर्तीत ओततो. म्हणजे च की त्या मातीच्या मूर्तीत आपण परब्रम्ह तत्व प्रस्थापित करतो / कल्पितो. त्यालाच प्रतिष्ठापना असे म्हणतात. तसेही ते तत्व जळी स्थळी काष्ठी पाषाणी असतेच. पण आपल्या लाडक्या मूर्तीत ते पहायला सोपे जाते. अर्थात हे समजून पूजा करायला हवी तर च होईल.     अथर्वशीर्षात पण लिहिले आहे की हे गणेशा तूच साक्षात आत्मा आहेस. ऋषी मुनींनी मूर्तिपूजेच्या माध्यमातून आपल्याला मूळ तत्व कळायला किती सोप्पे केले आहे नाही का ?  🕉 वैद्य प्रसाद फाटक ९८२२६९७२८८

इस्लाम हा खरा शांतीचा धर्म ठरावा.

Image
मी मानवता मानतो. पण ती आंधळी नसावी.  नीट सगळा अभ्यास केल्यावर हे लक्षात येतं की कुराण मधील नको त्या गोष्टी follow केल्याने इस्लाम प्रचंड पसरला; पण त्यातून शांतता हा इस्लाम चा अर्थच हरवला.  1000 साली भारतात नावाला देखील नसणारा धर्म 2000 साली किती वाढला ते आकडे बघता आणि किती क्रौर्य झाले याचा विचार करता ते अमानवी होते. ते सगळे बंद झाले पाहिजे. माणुसकी वाढली पाहिजे. मग सौहार्द येईल. बदला मंडळी; तसे झाले तरच सत्य न्याय नीती चा इस्लाम सिद्ध होईल.