Posts

Showing posts with the label पैसा

मना कल्पना ते नको विषयां ची.

Image
मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची ची - हे समर्थांनी सांगून ठेवलं आहे. पण काय काय करायचं यावर ?         तर असं आहे की धर्म हा सांगायला फार सोपा पण जगायला फार अवघड असतो. तुम्ही कुणाला सांगा किंवा नका सांगू पण आचरण मात्र जरूर करा असे साधू संत सांगतात. मी माझ्या पहिल्या आणि कधीच प्रकाशित  न झालेल्या  कथेला नाव दिले होते ' आकाश माती '  प्रकृतीचा व आत्म्याचा एक अंतस्थ संघर्ष जो माझ्या आत सतत चालू असतो. तो तुम्हा प्रत्येकाच्या आत ही असतोच. मनाला सारे काही हवे असते जे त्याला किंवा  त्याच्या मालकाला म्हणजे आपल्याला त्रासदायक असू शकते.  उदाहरण द्यायचे तर  प्रमेही [ diabetecic ] व्यक्तीला गुलाब जामून ! त्याचे मन म्हणते आणा येऊ द्या. एक / दोन खाऊन काय बिघडणार आहे ? आणि सत्य असते की थांबा नका खाऊ. यात जिव्हा जिंकली की विनाश आणि आत्मा सत्य जिंकले की लाभ असतो. म्हणून ही आकर्षणे म्हणजेच विषय कंट्रोल करायला हवेत. धर्म हा हे सत्य सांगतो त्यामुळे तो कडु पण वाटतो पटला तरी आवडत नाही. म्हणुन तर मनाच्या श्लोकातून स्वामीजींनी...