Posts

Showing posts with the label मानवता

समविचारी सेलिब्रिटी.

Image
● प्रियजन हो, यातला जो पहिला फोटो आहे तो मंचाचा विचार थोडक्यात मांडणार्या पॅम्प्लेट चा आहे.  ● दुसरा जो आहे तो बराक ओबामा च्या नव्या पुस्तकाच्या प्रिफेस मध्ये व्यक्त केलेला विचार आहे. ● ओबामा असे म्हणतो की, आता जग छोटे झाले आहे त्याच्या पुढील समस्या अफाट आहेत. आपण एकमेकांच्या संपर्कात येणारच आहोत; तर आपण सगळ्यांनी एकत्र राहण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. अन्यथा आपण नष्ट होऊ.

हिंदुत्वाचे वारे की वावटळ?

Image
हिंदुत्वाचे वारे की वावटळ? ■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.  ● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते. ● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे. ● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे. हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे....

मानवता और धर्म. नास्तिकों की मानवता.

Image
■ मैं हाल ही में फ्रैंकफर्ट-शिकागो फ्लाइट से यात्रा कर रहा था। उस समय मेरी मुलाकात एक पोलिश व्यक्ति से हुई। जब हमने उससे बातचीत की, तो उसने कहा; 'मैं नास्तिक हूँ। ईसाई धर्म में तरह-तरह की अनैतिकता देखकर मैंने खुद को बाहर कर लिया।'  ● फिर हमारी मानवता के बारे में कुछ बातें हुईं। उस समय उसने एक बहुत बढ़िया कथन कहा कि; "यदि आप एक अच्छे इंसान बनना चाहते हैं, तो आपको धर्म या ईश्वर की आवश्यकता नहीं है।" कितना बढ़िया वाक्य है! मैंने पहले भी यह कहा है। लेकिन चूँकि मैं एक धार्मिक व्यक्ति हूँ, इसलिए उस नास्तिक पोलिश व्यक्ति का यह कथन मेरे द्वारा कही गई बात से अधिक महत्वपूर्ण है। इसलिए मैंने इसे यहाँ उद्धृत किया है।  ■ फिर सवाल उठता है - हमें इस तथ्य से क्या समझना चाहिए कि मानवता के बारे में लिखते समय अक्सर धर्मों का उल्लेख किया जाता है? यदि धर्म के बिना मानवता बढ़ सकती है। तो फिर धर्म का उल्लेख करने की लगातार आवश्यकता क्यों है?  □ इसके पीछे दो कारण हैं, एक अच्छा और एक बुरा।  ● 1 अच्छा कारण यह है कि मूल रूप से जैसा कि हमने पहले लिखा; धर्म की रचना इसलिए की गई ताकि मानवता विकसित ...

हिंदुत्व आणि माणुसकी

Image
■ माझ्यासाठी सध्याचा हिंदुत्वाचा विषय आहे तो मानवता, माणसाची प्रगती, माणसाची माणूस म्हणून प्रगती या साऱ्या गोष्टीं चा एक भाग आहे.  ● आज मानवतेला काही गोष्टी गंभीर अडथळा आणत आहेत. त्यापैकी काही आहेत... जसे की ' Islamization of the world / जिहाद / गझवा ए हिंद ' . . . .. यांच्यामुळे हिंदू धर्माला धक्का लागू शकतो की जो मानवतेला देखील मोठा धक्काच आहे.  ● म्हणून इथला हिंदुत्वाचा लढा लढणे fair enough यथायोग्य आहे.  ■ पण म्हणून त्यांनी दुसरे टोक गाठले तर ते चालणार नाही. ● एक उदाहरण बघूया : दलित विषयक जी काही वर्तणूक सवर्णांकडून झाली ती पण मानवतेला धक्काच होती व आजही काही प्रमाणात होत आहे. त्यालाही मानवतेला धक्का म्हणून आपला विरोध होता व आहे. ● पण आज काही दलित दुसऱ्या टोकाला जात आहेत. ते हिंदू धर्माला शिव्या देतात. Like blasphemy only ! _ तर अशा दलितांच्याही विरुद्ध बोलावे लागते.  ● तसेच हिंदू धर्म सुस्थापित ठेवण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते बरोबर आहेत. परंतु जर ह्या विशिष्ट उल्लेखित दलितांप्रमाणे हिंदू ही दुसऱ्या टोकाला गेले तर त्यालाही आपला विरोधच असेल. काही अंशी काहीजण तसे ...

माणुसकी आणि धर्म. नास्तिक व मानवता Humanity 31

Image
■ नुकताच फ्रॅंकफर्ट - शिकागो या विमानाने प्रवास करत होतो. त्यावेळेला मला एक पोलंडचा माणूस भेटला. त्याच्याशी गप्पा झाल्या तेव्हा तो म्हणाला की; ' मी नास्तिक आहे. ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळ्या प्रकारचे अनाचार पाहून मी स्वतःला सर्वाच्या बाहेर करून घेतले. ' ● मग आमच्या मानवतेबद्दलही काही गोष्टी झाल्या. त्यावेळी त्यांनी एक खूप छान विधान केलं की;  " जर तुम्हाला चांगला माणूस बनायचं असेल तर तुम्हाला धर्माची अथवा देवाची काहीच गरज नाही. " खरंच किती छान वाक्य आहे! याआधी मी सुद्धा बोललेलो आहे. परंतु मी एक धार्मिक माणूस असल्यामुळे मी बोलण्यापेक्षा त्या नास्तिक पोलीश माणसाचं हे बोलणं जास्ती महत्त्वाचा आहे. म्हणून इथे कोट केलं. ■ मग प्रश्न असा येतो की - मानवते संबंधी बोलते लिहीत असताना अनेकदा धर्मांचा उल्लेख होतो त्याचा काय अर्थ काढायचा ? धर्माशिवाय जर माणुसकी वाढू शकते. तर मग धर्माचा सतत उल्लेख कशाला हवा ?  □ त्याच्यामागे एक चांगलं आणि एक वाईट अशी दोन कारणं आहेत. ● 1 एक चांगलं कारण असं की मुळात आपण मागे लिहिल्याप्रमाणे; मानवता विकसित व्हावी म्हणूनच धर्म निर्माण झाले. मग या धर्मांनी ...

तिघांचा आशिर्वाद.

Image
माझ्या क्लिनिकच्या वेटिंग रूम मध्ये कायम वास्तव्य असलेले तीन.... माऊलीच्या अलीकडे पलीकडे काहीही ज्ञान नाही.... तुकोबाच्या भक्ती ला जगात तोड नाही.... आणि सर्व धर्मांचे मूळ स्थान म्हणजे फक्त माणुसकी... ✴️ माणुसकी सर्व धर्मांच्या वर आहे. मानवतेमुळेच धर्म निर्माण झाले. कसे ते पहा: ■ सुरुवातीच्या काळात आपण प्राण्यांसारखे जगत होतो. मग आपल्या मेंदू, भावना आणि विचारांमुळे आपण वाढू लागलो. आपण चांगले मानव व्हावे अशी आमची इच्छा होती. दुसरा कोणताही प्राणी एक चांगला कुत्रा किंवा चांगली चिमणी होण्याचा विचार करत नाही! याउलट स्वार्थी हेतूंमुळे कधी कधी आपण प्राण्यांपेक्षाही वाईट बनतो. या दोन्ही कारणांसाठी देखील मानवतेच्या विचारांची च गरज आहे. ■ वेगवेगळ्या संस्कृतींनी आणि वेगवेगळ्या धर्मांनी लोकांना चांगले मानव बनवण्याचे काम हाती घेतले. यावरून प्रथम काय आहे ते स्पष्टपणे दिसतेच आहे! काही धर्म उत्कृष्ट असू शकतात आणि काही त्या कामामध्ये उत्कृष्ट नसतीलही. पण उद्देश तोच आहे. ■ उलट पक्षी असे ही घडते आहे की धर्मात काही चुकीच्या गोष्टी, प्रथा देखील आहेत. त्या नीट कराव्या लागतील.  मानवता हा असा आधार आहे की ज...

तीन चित्रांमध्ये मानवतेची दोन अंगे.

Image
मानवतेची दोन अंगे आहेत. ● १. एक अंग म्हणजे चांगले असणे, वागणे - पहिल्या चित्रात त्याचे एक उत्तम उदाहरण आहे -  मल्टी टॅलेंटेड स्वानंदीचा युट्युब चॅनेल व त्यावरील कमेंट्स. One World. ● २. दुसरे अंग म्हणजे सर्व सीमा पार करून, भेदाभेद मनात देखील न आणता एकत्र येणे, खेळणे व मैत्र जुळणे. [ माझा   मुलगा या दुसर्‍या चित्रात आहे; ही गोष्ट मला अभिमानास्पद आहे. 😊 ]  Won world another angle -  ● ३. तिसऱ्या चित्रात तुम्हाला दिसेल की स्वामी विवेकानंद ब्रिटिशांबद्दल काय म्हणाले होते. ते म्हणतात की; " माझ्या मनात ब्रिटिशांबद्दल अत्यंत घृणा होती ; मात्र त्यांना भेटल्यानंतर माझे पूर्ण मतपरिवर्तन झाले. मी त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतो ! " राज्य करणारे क्रूर ब्रिटिश म्हणजेच सर्व ब्रिटिश नव्हेत हे त्यांच्या लक्षात आले. Don't count people in plurals हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. धन्यवाद.  🙏 

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

Image
                   मानवतेची महागाथा          मला उमजलेली मानवता आपल्यासमोर मांडत आहे. हे माझ्या अल्प बुद्धी ला सुचलेले विचार आहेत. आपण यावर विचार करा व पटेल तेव्हढे स्वीकारा व पसरावा. जे पटले नाही ते सोडून द्या. सर्वांचे सर्व मुद्यांवर संपूर्ण एकमत कधी होत नसते. नवरा बायको आई मुलगा यांचे देखील होत नसते. इतरांची तर काय कथा ? हे विचार कसे व कुठून आले त्याची पूर्व पिठीका : मी खूप वेळा बोलत असतो, तशी माझी दोन मने देखील कधी कधी आपसात बोलत असतात ! असाच एक संवाद प्रकट करतोय. मन १ व मन २ अशी सोप्पी नावे देतोय त्यांना. ...  मन १ - तुला आठवतं का ?  मन २ - काय रे ?   मन १ - बरोबर ४६ वर्ष झाली तू एका बाईंच्या अन्यायाची तक्रार घेऊन शाळेचे सुपरवायझर श्री. कुलकर्णी सरांकडे गेलास तेव्हा ते काय म्हणाले ?  मन २ - आठवतंय की. ते म्हणाले की तुझी तक्रार नंतर सांग. पण आधी तू काय आहेस ते बघ ? तू काय तुकारामाचा अवतार लागून गेलास काय ? ...