Posts

Showing posts with the label कथा

ज्ञानेश्वरी वाचन भाग ~12 रामनवमी विशेष भाग.

Image
https://youtu.be/0tMqh_Hv6D8?si=cLT7OYqlaMw5S19x ही लिंक उघडणार नाही परंतु माझ्या युट्युब वर गेलात की लगेच सापडेल हा भाग. ज्ञानेश्वरी वाचन सोप्या मराठी अर्थासहित भाग ~ 12 #श्रीरामनवमी #उत्सव निमित्त विशेष वक्तव्य. जय #श्रीराम ।। 🕉 🙏  प्रभू रामचंद्र म्हणजे आदर्श. म्हणून त्यांना म्हटले पुरुषोत्तम. ते म्हणजे राज्य, ते म्हणजे पुत्र, ते म्हणजे पती, ते म्हणजे बंधू.  केवळ त्यांना नमस्कार करून मोकळे नाही व्हायचं तर कणाकणाने का होईना त्यांचे आदर्श आपल्यामध्ये आणायचे.

पाश्चात्य संस्कृती नेमकी कशी होती? western culture.

Image
पाश्चात्त्य संस्कृती म्हणजे नक्की काय याचा मागवा घेत होतो. अर्थात आज जे काही आपल्यासमोर पाश्चात्य जग उभं आहे; त्याला संपूर्णपणाने पाश्चात्य संस्कृती असे म्हणता येणार नाही. ती पाश्चात्य संस्कृतीची आजची व्हर्जन आहे. त्यामुळे पूर्व काळातील पाश्चात्त्य संस्कृतीचे काही ज्ञान होते का? असे बघत होतो. त्या संबंधाने जे काही थोडेफार वाचन झाले त्यातली ही काही पुस्तके आहेत. त्यांच्या अनुषंगाने निरीक्षणे नोंदवणार आहे. अधिकृत साहित्य हे निश्चितच समाजाचा आरसा असते. त्यामुळे या इंग्लिश क्लासिकल्स चा विचार त्या अर्थाने केला असता चुकीचा होणार नाही असे वाटते. जरी शंभर टक्के ठोसपणाने सांगता येत नाही; कारण काळ वेगळा आहे तरी चांगला अंदाज तर नक्की येत आहे. यातले अर्थातच पहिले पुस्तक बायबल आहे. - 0001 सेन्स अँड सेन्सिबिलिटी व प्राईड अँड प्रिज्युडिस - 1805. मग शांता शेळके यांनी अनुवादित केलेलं लिटल वुमेन हे अमेरिकन जीवनाबद्दल आहे 1868. द पोर्ट्रेट ऑफ लेडी 1885. चार्ली चापलीन जीवन चरित्र 1900 च्या पुढे.  डायरी ऑफ अना फ्रेंक 1939. या सर्वांमधून असं दिसतं की उच्च अभिरुची असणारी ही संस्कृती होती. बे...

रामायण कथा की इतिहास ?

Image
रामायण इतिहास नव्हे कथा ? मध्यंतरी एका जिवलगाने अचानक संपर्क तोडला तेव्हा मला जी मायुसी आली तेव्हा माझी पक्की खात्री झाली की रामायण हे काव्य आहे. रामायण हे थोडी  बहुत कल्पना आहे, आणि त्यातून निर्माण झालेली कथा आहे. इतिहास न्हवे ? किंवा सत्यावर आधारित कादंबरी असते तसे आहे. एक छोटासा कथा लेखक म्हणून मला हे समजू शकते की लेखकाची स्वतःची व भोवतालची अनुभूती कथेतून व्यक्त होत असते. तसंच काहीसं इथे दिसतं आहे. राजा राम होऊन गेले असतील त्यांनी मोठा पराक्रम केला असेल. म्हणूनच शिवरायांवर जशा कादंबऱ्या झाल्या तसेच त्यांच्यावर रामायण लिहिणे झाले.  प्रभूंना जो शोक झाला ते प्रकरण वाचलं का ? स्वतः परब्रम्ह हे बायको हरवल्यावर इतकं दुःखी होईल ? उपनिषदे काय सांगतात; की मला जन्म नाही, मृत्यू नाही मग कसली चिंता आणि कसला शोक ?  प्रभूंचे हे human nature लेखकाने अनुभवाने + कल्पनेने रंगवले असल्याने असे वर्णन आले असणार. आणखी एक प्रश्न ? परब्रम्ह हे एकदा  सीतेला 14 वर्षांचा  शिक्षा नसताना आपणहून भोगलेल्या वनवासानंतर  अग्निदिव्य देखील केलेल्या माउलीला  केवळ धोब्याच्या बडबडीवरून पु...