Change is not impossible.
दिवसेंदिवस #माणसे आणखीनच घसरत चालली आहेत. 😡
#पशूं ची देखील उपमा देता येत नाही. 🙀
#हव्यास, #क्रौर्य, #कायद्याची भीती नसणे...
#नसरापूर आणखी कितीतरी.
या विषयाला अनेक पैलू आहेत. फोटो पोस्टमध्ये जे व्यक्त करता आले नाही ते आता सांगतो.
● पशू क्रुर असतात ते निसर्गाचा भाग म्हणून. निसर्गाने अन्नसाखळी निर्माण केली आहे की ज्यात त्यांना दुसरा पशु मारून खाणे अपरिहार्य असते. त्यामुळे त्यांना तशा अर्थाने क्रूर म्हणता येत नाही. ते निसर्ग नियमानुसार जगत असतात. माणसाला जी काही अतिरिक्त बुद्धी निसर्गाने दिली त्याचा उपयोग त्याने प्रगती बरोबरच अधोगतीसाठी देखील करून घेतला आहे. पशु कधीही भ्रष्टाचार करताना दिसत नाहीत, पशु कधी बलात्कार करतात असे माहीत नाही.
● आता माणसाचा हव्यास, लालसा हे दिवसेंदिवस फारच वाढत चालले आहे. तो पशु पेक्षाही खालच्या दर्जाला घसरला आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत
या साठी उपाययोजना ही दोन्ही बाजूंनी होऊ शकते.
■ सभोवतालीचे वास्तव असे आहे की; खरोखरच यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका येणे स्वाभाविक आहे.
》 परंतु ते अगदीच अशक्य नाहीये.
● एक - पैसा कमावण्याची जशी तीव्र इच्छा असते तशी चांगला माणूस होण्याची तीव्र इच्छा निर्माण व्हायला हवी.
● दुसरे - म्हणजे कायदा व शासन व्यवस्थापन इतके चोख आणि प्रभावी हवे की त्याची भीती उत्पन्न व्हायला हवी.
● तिसरा मुद्दा - समाजाची वीण अशी दृढ व्हायला हवी; की जेणेकरून समाजाचे किंवा लोक काय म्हणतील याची चिंता देखील लागायला हवी.
हल्ली असे शिकवले जाते की लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
पण लोक काय म्हणतात ही एक माणसाला मर्यादेत ठेवणारी गोष्ट राहिली आहे. ती असायलाच हवी. चांगले करणाऱ्याला ती भीती नसावी व वाईट करणाऱ्याला मात्र नक्कीच असावी.
~ डॉक्टर प्रसाद फाटक पुणे
Comments