Posts

Showing posts with the label हव्यास

समविचारी सेलिब्रिटी.

Image
● प्रियजन हो, यातला जो पहिला फोटो आहे तो मंचाचा विचार थोडक्यात मांडणार्या पॅम्प्लेट चा आहे.  ● दुसरा जो आहे तो बराक ओबामा च्या नव्या पुस्तकाच्या प्रिफेस मध्ये व्यक्त केलेला विचार आहे. ● ओबामा असे म्हणतो की, आता जग छोटे झाले आहे त्याच्या पुढील समस्या अफाट आहेत. आपण एकमेकांच्या संपर्कात येणारच आहोत; तर आपण सगळ्यांनी एकत्र राहण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. अन्यथा आपण नष्ट होऊ.

हिंदुत्वाचे वारे की वावटळ?

Image
हिंदुत्वाचे वारे की वावटळ? ■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.  ● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते. ● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे. ● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे. हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे....

मना कल्पना ते नको विषयां ची.

Image
मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची ची - हे समर्थांनी सांगून ठेवलं आहे. पण काय काय करायचं यावर ?         तर असं आहे की धर्म हा सांगायला फार सोपा पण जगायला फार अवघड असतो. तुम्ही कुणाला सांगा किंवा नका सांगू पण आचरण मात्र जरूर करा असे साधू संत सांगतात. मी माझ्या पहिल्या आणि कधीच प्रकाशित  न झालेल्या  कथेला नाव दिले होते ' आकाश माती '  प्रकृतीचा व आत्म्याचा एक अंतस्थ संघर्ष जो माझ्या आत सतत चालू असतो. तो तुम्हा प्रत्येकाच्या आत ही असतोच. मनाला सारे काही हवे असते जे त्याला किंवा  त्याच्या मालकाला म्हणजे आपल्याला त्रासदायक असू शकते.  उदाहरण द्यायचे तर  प्रमेही [ diabetecic ] व्यक्तीला गुलाब जामून ! त्याचे मन म्हणते आणा येऊ द्या. एक / दोन खाऊन काय बिघडणार आहे ? आणि सत्य असते की थांबा नका खाऊ. यात जिव्हा जिंकली की विनाश आणि आत्मा सत्य जिंकले की लाभ असतो. म्हणून ही आकर्षणे म्हणजेच विषय कंट्रोल करायला हवेत. धर्म हा हे सत्य सांगतो त्यामुळे तो कडु पण वाटतो पटला तरी आवडत नाही. म्हणुन तर मनाच्या श्लोकातून स्वामीजींनी...