Posts

Showing posts with the label बायबल

पाश्चात्य संस्कृती नेमकी कशी होती? western culture.

Image
पाश्चात्त्य संस्कृती म्हणजे नक्की काय याचा मागवा घेत होतो. अर्थात आज जे काही आपल्यासमोर पाश्चात्य जग उभं आहे; त्याला संपूर्णपणाने पाश्चात्य संस्कृती असे म्हणता येणार नाही. ती पाश्चात्य संस्कृतीची आजची व्हर्जन आहे. त्यामुळे पूर्व काळातील पाश्चात्त्य संस्कृतीचे काही ज्ञान होते का? असे बघत होतो. त्या संबंधाने जे काही थोडेफार वाचन झाले त्यातली ही काही पुस्तके आहेत. त्यांच्या अनुषंगाने निरीक्षणे नोंदवणार आहे. अधिकृत साहित्य हे निश्चितच समाजाचा आरसा असते. त्यामुळे या इंग्लिश क्लासिकल्स चा विचार त्या अर्थाने केला असता चुकीचा होणार नाही असे वाटते. जरी शंभर टक्के ठोसपणाने सांगता येत नाही; कारण काळ वेगळा आहे तरी चांगला अंदाज तर नक्की येत आहे. यातले अर्थातच पहिले पुस्तक बायबल आहे. - 0001 सेन्स अँड सेन्सिबिलिटी व प्राईड अँड प्रिज्युडिस - 1805. मग शांता शेळके यांनी अनुवादित केलेलं लिटल वुमेन हे अमेरिकन जीवनाबद्दल आहे 1868. द पोर्ट्रेट ऑफ लेडी 1885. चार्ली चापलीन जीवन चरित्र 1900 च्या पुढे.  डायरी ऑफ अना फ्रेंक 1939. या सर्वांमधून असं दिसतं की उच्च अभिरुची असणारी ही संस्कृती होती. बे...

वेगवेगळ्या धर्मातील सर्वशक्तिमान हा एकच आहे. Almighty is one

Image
🎉 सर्वशक्तिमान हे एक अस्तित्व आहे; ज्याचे नाव भिन्न आहे. बघा कसं? ■ त्याच्याबद्दलचे सर्व धर्मविचार आता येथे उद्धृत केले जातील उदा. बायबल, कुराण, भगवद्गीता :  ● वेगवेगळ्या धर्माचे विचारातून सर्वशक्तिमान म्हणतात ते काय आहे हे तुम्ही पाहू शकता : ✝️ ● पवित्र बायबल - स्तोत्र २४: पृथ्वी आणि जे काही अस्तित्वात आहे ते देवाचे आहे. जगात राहणारे सर्व देवाचे आहेत.  🕉 ● उपनिषद - ईशावास्य उपनिषद - श्लोक १ : हे जग भगवान ईशाचे घर आहे आणि जे काही वास्तव्य आहे ते त्याची मालमत्ता आहे.  ● गीता - भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्यांनी हे जग निर्माण केले.  ☪️ ● पवित्र कुराण फुसलियत २.२९ : त्यानेच तुमच्यासाठी पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व निर्माण केले. मग त्याने स्वतःला स्वर्गाकडे निर्देशित केले आणि त्यांना सात स्वर्ग बनवले आणि तो सर्व गोष्टी जाणणारा आहे. तो अल्लाह आहे.  ■ 3 सशक्त धर्मांचे सर्व महत्त्वाचे उपदेश सर्वशक्तिमान देवाविषयी अशा शब्दांत एकच गोष्ट सांगतात. फक्त ते त्याला वेगवेगळी नावे देतात. जसे - God, ईश्वर अल्ला.  ☆ जर तो समान असेल तर इतर गोष्टी दुय्यमच न्हवेत का ?  ह...