Posts

Showing posts with the label ज्येष्ठ नागरिक

साठीच्या पुढील बॅटिंगचा माझा पॅटर्न

Image
साठीच्या पुढील बॅटिंग पॅटर्न : काल ईश्वराला असे म्हणण्याचा योग आला की आता पूर्ण समाधान आहे आता काहीही मागणं नाही. ● तसं दोन वर्षांपूर्वी साठाव्या वर्षालाच हे ठरवायला सुरुवात केली होती की नो बकेट लिस्ट / no wish list. म्हणजे आता करायचंच असं काहीही ठरवायचं नाही. अमुक ठिकाणी जायचं, तमुक हे बघायचं हे खायचंय असं काही ठरवणे नाही.  No desperate Longing for something or other.  ☆ बऱ्याचशा वेळा पाळले जाते, कधी कधी घसरतं पण चालू ठेवलंय.  ● त्यात विरोधाभासात्मक वाटणारी दुसरी गोष्ट अशी आहे की; कुठलीच गोष्ट नाकारायची नाही. सर्व प्रकारचे आनंद घ्यायचे.  ● तिसरी गोष्ट अशी की; काम मात्र करत राहायचं. ❤️ किती रन आहेत, कधी आऊट आहे हे माहिती नाही. पण टार्गेट्स न ठरवता बॅटिंग करत राहायचं. रन्स होतील तेवढ्या होतील.  ~ प्रसाद फाटक ब्लॉग्स. 9822697288