Posts

Showing posts with the label portrait \ vyaktichitre

Bapoo sachchaa policevala ek vyaktichitr

Image
सच्चा पोलिस वाला बापू बापु दामलेची भेट हा खरे तर एक विलक्शण अभिमानाचा विषय.या भेटीत अर्थात कोणताही योगायोग नव्हे कारण ही भेट म्हणजे जन्मजात ओळखच म्हणावी असे अतुट बन्धन! एकाच गल्लीत लहानाचे मोठे होणार्या मुलान्ची मैत्री अत्यन्त नैसर्गिक असते,त्यात कोठलाही दिखावा नसतो, स्वत:ला कोणितरी भारी वेगळी व्यक्ति असल्याचे भासवण्याचा खटाटोप नसतो,बालपणीच्या अनन्त कडू गोड आठवणी असतात. धमाल असते, भान्डणे असतात,पहील्या वहिल्या चुका असतात.बापु त्याचा मोठा भाउ बाळु मी आणि माझा धाकटा भाउ ही म्हणजे एक पक्कि चौकडी होती. त्यात भर पडता पडता एक पूर्ण india ची cricket team तयार होवुन गेली.भरपूर खेळणे,पोहायला जाणे, लाम्ब लाम्ब सायकलवर फिरायला जाणे,चित्रपट पहायला जाणे अश सगळ्य गोष्टी बरोबरच होत असत. एकमेकान्शिवाय करमत नसे. बापु आणि मी आम्ही दोघे अगदी देवभोळे होतो त्यामुळे बर्याच वेळा आमचा देव्हारा मान्डून देव देव खेळ देखिल चालत असे. बापुच्या घरची परिस्थिति काही कारणाने एकदम ढासळली होती.आइ वडील अत्यन्त सज्जन आणि स्वाभिमानी कोणापुढे हात पसरायचा नाही हे पहिले ब्रिद. आइने ४ घरची पोळ्यान्ची कामे सुरु के...

Manoj Shinde

मनोज शिन्दे ज्या गुरुवारातल्या बावन बोळात गोपि भेटला त्याच बावन बोळातल्या चिखलात मनोज शिन्दे नावाचे एक कमळ उगवताना मी बघितले.इन्दिराजीनच्या हत्येच्या काळात जेव्हा मी तिथे शाखेच्या कामासाठी गेलो तेव्हा हा महाविद्यालयात शिकत होता. हा क्वचित कार्यक्रमाला वगैरे येत असे. तो काही फार रोज शाखेत येत नसे. पण तिथे एकुण तरुण वर्ग फारसा सन्घाजवळ येत नसल्यने मी त्याच्या कडे नेहेमी येवु जावु लागलो. मध्यम उन्चीचा, वर्णाला काळा,काहिसा स्थुल आणि ढगळ कपड्यातला मन्या बघितल्यावर त्याचा कोणताहि प्रभाव पडत नसे.बहुधा कधी केसानाहि कन्गवा लागत नसावा. त्याचा फारसा काही उपयोग नाहि असेच सर्वान्चे मत होते. पण मी मात्र त्याला सोडायचे नाही असे ठरवले. आणखी एक विशेश बाब आठवते ती म्हणजे त्याला एक अतिशय सुन्दर बहीण होती;कि जिला माझ्याबद्दल थोडे आकर्षण देखील असावे.मला प्रचारक म्हणुन जायचे असल्याने मी तो विषय पुढे वाढू दिला नाही."इथे सुरु होण्या आधी सम्पली कहाणी”. मन्याची थोडी फार मदत झाली असेल नसेल तोच माझी बदली झाल्याने त्याचा शाखेत येण्याचा विषय सम्पला. पण कारणपरत्वे सम्बन्ध ठेवल्याने ओळख टिकून राहिलि.तो gr...

Ganabab

Image
गणाबाब तेव्हा माझ्यापेक्षा जवळजवळ ३५ एक वर्षांनी मोठे होते. तसं म्हंटलं तर मराठीत त्यांचा अहो जाहो असा उल्लेख करावा लागतो आहे. पण आमच्या कोकणीत मात्र माणूस कितीही मोठा असला तरी त्याचा उल्लेख एकेरीतच केला जातो. त्या भाषेत त्यामुळे एक वेगळीच आपुलकी, समानता वगैरे असावी असे वाटू लागते. संघाकडे काही लोकं विनामुल्य काम करणारे लोकं असतात त्यांना प्रचारक म्हणतात. हे लोकं निस्वार्थ पणे देशसेवेसाठी घर सोडतात. मी आपला १/ १.५ वर्षच घर सोडून प्रचारक म्हणून गेलो आणि मला गोव्यात पाठवण्यात आले. तिथे वाल्पोई हे अगदी स्वप्नातले गाव असेच म्हणता येईल असे एक गाव आहे तिथे मला ठेवले होते. आणि इथेच गणाबाबशी माझी पहिली ओळख झाली.शांतादुर्गेच्या शाळे जवळ एक शाखा होती. त्या शाखेत मला कोणीतरी घेवून गेलं.तो परिसर इतका नयनरम्य होता कि माझ्या आनंदाला पारावर उरला न्हवता! सगळीकडे नुसतं हिरवेगार, एकीकडे डोंगर, दुसरीकडे उतारावर नारळ पोफळीच्या वाड्या, अशातच डोंगरावरून येणारे छोटे अवखळ झरे! शाखा सुटायच्या अगदी पाच मिनिट आधी एक वयस्कर व्यक्ती वय असेल ६० च्या आसपास, हळूहळू चालत आत येताना मला दिसली. बुटकी असून ती...

Gopi

नेमके सांगायचे झाले तर १९८४ साली मी संघाची शाखा चालवण्यासाठी गुरुवार पेठेतल्या एका गल्लीत जायला सुरुवात केली. अत्यंत मागासलेला असा हा एक भाग होता. बावन बोळ असे त्या भागाचे नाव म्हणजे इतक्या बारीक बारीक गल्ल्या एकातून दुसर्या फुटणार्या कि बाहेर पडणेच मुश्कील व्हावे. जंगलात जसा चकवा लागतो म्हणतात ना तसा लागायचा. ह्या बावन बोळात काही थोडेच लोकं संघाचे होते आणि मुख्य पगडा कॉंग्रेस वाल्यांचा. एकंदर लोकं गरीब, कमी शिकलेले आणि मेहेनत मजुरी करणारे. एखादे बेकार तरुणांचे टोळके कायम तिथे असणाऱ्या एका देवळाच्या पायऱ्यांवर बसलेले असे. शाखेत मुलांना तोटा नसे, भरपूर मुले पण एकापेक्षा एक अर्क, त्यांना शिस्त लावणे दूरच पण नुसते त्यांचे खेळ तासभर घ्यायचे म्हंटले तरी घाम फुटायचा. या आधीच्या शाखेत शिस्त लावण्यासाठी मुलाना फटका दिल्याने फारच समस्या झाल्या यामुळे इथे हात उचलायचा नाही असे मी ठरवलेलेच होते. त्यामुळे हे काम आणखीनच कठीण झाले, पण दुसर्या अर्थाने बरे झाले नाहीतर माझी काही धडगत नव्हती. एक दिवस गल्लीच्या बाहेरून दुसर्या जवळच्या गल्लीतून एक नवीनच मुलगा आमच्या शाखेत येवून हजा...