Bapoo sachchaa policevala ek vyaktichitr
सच्चा पोलिस वाला बापू
बापु दामलेची भेट हा खरे तर एक विलक्शण अभिमानाचा विषय.या भेटीत अर्थात कोणताही योगायोग नव्हे कारण ही भेट म्हणजे जन्मजात ओळखच म्हणावी असे अतुट बन्धन! एकाच गल्लीत लहानाचे मोठे होणार्या मुलान्ची मैत्री अत्यन्त नैसर्गिक असते,त्यात कोठलाही दिखावा नसतो, स्वत:ला कोणितरी भारी वेगळी व्यक्ति असल्याचे भासवण्याचा खटाटोप नसतो,बालपणीच्या अनन्त कडू गोड आठवणी असतात. धमाल असते, भान्डणे असतात,पहील्या वहिल्या चुका असतात.बापु त्याचा मोठा भाउ बाळु मी आणि माझा धाकटा भाउ ही म्हणजे एक पक्कि चौकडी होती. त्यात भर पडता पडता एक पूर्ण india ची cricket team तयार होवुन गेली.भरपूर खेळणे,पोहायला जाणे, लाम्ब लाम्ब सायकलवर फिरायला जाणे,चित्रपट पहायला जाणे अश सगळ्य गोष्टी बरोबरच होत असत. एकमेकान्शिवाय करमत नसे. बापु आणि मी आम्ही दोघे अगदी देवभोळे होतो त्यामुळे बर्याच वेळा आमचा देव्हारा मान्डून देव देव खेळ देखिल चालत असे.
बापुच्या घरची परिस्थिति काही कारणाने एकदम ढासळली होती.आइ वडील अत्यन्त सज्जन आणि स्वाभिमानी कोणापुढे हात पसरायचा नाही हे पहिले ब्रिद. आइने ४ घरची पोळ्यान्ची कामे सुरु केलि आणि बापुनेहि कोणाच्या घरच्या पुजा, कुठे पेपर लाइन अशी कामे सुरु केलि त्याचा दादा देखील कामाला लागला.तेव्हढ्यात वडील अकाली निधन पावले.आइला हा व्याप साम्भाळणे कठीण होउन बसले आणि त्यातच एका ओळखिच्याने एका फार मोठ्या industrialist ला घरी आणले. बापुचे व्यक्तिमत्व बघून त्याने बापूला घेउन जाण्याचा प्रस्ताव ठेवला. दत्तक पुत्राप्रमाणे तो त्याचे सारे काही करणार होता.लेकराचे भले होते असे पाहून आइने छातीवर दगड ठेवला.बापु त्याच्या बरोबर लातूरला गेला. मोठा buisiness खूप सम्पत्ति असे सारे असून त्याला तो सोन्याचा चारा नकोस वाटला आइची आठवण येउ लागली आणि तो ४ च महीन्यात पळून आला.
पुन्हा पहिल्यासारखी सारी कामे सुरु झाली.पण त्याचे दुक्ख नव्हते. १० वी १२ वी पर्यन्त बापुची शैक्शणिक कामगीरी चमकदार नव्हती. तो फारसा कोणाच्या चर्चेतहि नव्हता.पण नन्तर मात्र त्याचे मुलात खेळणे थोडे कमी झाले,त्याने काहितरी विलक्शण करून दाखवण्याचे ठरविले असावे.प्रथम वर्ष BA करत असताना कोणा एका चान्गल्या जवाहीराच्या हाती हे रत्न लागले. त्याने याला पैलू पाडायचे पक्के मनाशी ठरविले सातत्याच्या बोलण्या वागण्यातून बापू च्या मनावर खोल असा परीणाम झाला.एकिकडे महाविद्यालयाच्या वक्त्रुत्व स्पर्धा, नाट्यवाचन या सारख्या extra curicular activities मध्ये नाव मिळवत असतानाच त्याने UPSC परिक्शेचा ध्यास घेतला आणि तो त्यात पुर्ण बुडून गेला.
आता त्याचे विश्व पूर्ण बदलून गेले. दादाचा आधार असला व आइचे कष्ट असले तरी अर्थार्जन करावेच लागत होते,शिवाय एवढ्या सार्या activities आणि UPSC सारखा आव्हानात्मक अभ्यास एवढे सारे करून देखील तो मित्रान्मध्ये क्वचीत आला की हास्याचे फवारे उडत असत.आनन्दाचा ठेवा म्हणूनच बहुधा त्याचे पाळण्यातले नाव आनन्द ठेवले असावे हे आता स्पष्ट व्हायला लागले होते.प्रचन्ड कष्ट घेउन अखेर बापूने UPSC मध्ये यश मिळवले. त्याचेी निवड पोलिस खात्यात झाली होती खरे त्याला collector व्हायचे होते,पण मिळालेले खाते त्याने हसत स्विकारले
training च्या काळातच त्याने आपले इरादे स्पष्ट करायला सुरुवात केली. दिलदार पणे त्याने सर्वाना party दिलि तेव्हा मसूरिचे फोटो दाखवताना तो सान्गत होता "सारेच जण येथे पैसे कमावण्याच्या एकमेव उद्देशाने येतात. एकेक जण त्यान्चा हुन्ड्याचा भाव किति असेल वगैरे किस्से सान्गत असतात मला ते आवडत नाही पण मी वाद घालत बसत नाही. देशाचा कारभार ज्यान्च्या हाती जाणार त्यान्चे पैसे खाण्याचे मनसुबे ऐकून मन फाटून जाते पण आहे हे असे आहे बघा" बापू कळवळून बोलत होता. हालाखीच्या स्थितितून आला असून ही बापूने स्वछ्छ कारभाराचा वसा मनोमन घेतला होता. आणी पुढे तो तसाच चालवला उतला नाही मातला नाही म्हणूनच सुरुवातीला म्हणालो कि बापू शी मैत्री हा अभिमानचा विषय आहे असे!
पण हा अभिमान एवढ्यावरच सम्पत नाही.पहील्याच posting च्या वेळी त्याने मुख्यमन्त्र्यान्च्या एका माणसाच्या दारू धन्द्यावर धाडी टाकल्या आणि कुठल्याच प्रकारे माघार घेण्यास नकार दिल्याने त्याची केवळ ६ दिवसात नक्शल भागात बदली झाली.हा बहुधा एक विक्रम असावा.
नक्शल भागात धडाडीने काम करत असताना देखील त्याने सामन्य पोलिस शिपायाच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी जे प्रयत्न केले ते विलक्शणच होत. त्यान्च्या घरान्मध्ये सुधारणा असोत की स्वास्थ्य योजना असोत खूपच धडपड होती त्यात, शिवाय निसर्ग रक्शणासाठी police ground भोवती झाडे लावण्याची योजना, वाचनालय.नक्शल भागात हे काही केले नसते तरी चालणार होते पण त्याने केले. पूर्वीच्या british governer च्या बन्गल्यात रहाताना बघून मला त्याची पुण्यातील खोली आठवली. पण बापू तोच होता नाष्त्यापासून रात्रीच्या icecream पर्यन्त सगळ्या मेनूत त्याने स्वतहा लक्श घातले होते. तिथे एका ज्येश्ठ शिपायाने केलेली चूक लक्शात आणून देताना त्याचा मान राखून केलेली कान उघाडणी म्हणजे फार वेगळच मिश्रण होते.
इतका कर्तव्यदक्श अधिकारी मुम्बईत हवाच म्हणुन भाजपा सेनेच्या युतीने त्याल प्रथम मुम्बईत आणला आणि एकापेक्शा एक शिखरे त्याने पादाक्रान्त केली. आम्हा मित्राना एकदा दक्शिण मुम्बईची सफर घडवताना त्याचा उत्साह लहानपणच्या cricket match च्या वेळच्या उत्साहापेक्शा कुठे कमी नव्हाता.लहान मूलासारखे आम्ही तिथे हुन्दडत होतो २ दिवस!
अनेक विषयान्वर टोकाचे मतभेद असून ही आमच्या चर्चेला कधी युद्धाचे स्वरूप येत नाही. पण ४\४ मुसलमान नन्ग्या तलवरी घेवून जिवावर उठले तरी त्याच्या secularism ला कधी धक्का पोचत नाही. विचाराचा तो पक्का आहे! पण असे वाटते की खूप देव धार्मीक असून वाइट कामे करणार्या पेक्शा हा माणूसकी जपणारा नास्तिक हजर पटीने श्रेश्ठ!
आईला पुण्यात एकटी राहू नये म्हणून पटवण्यासाठी मला मध्यस्थी करायला सान्गताना मात्र तो अगदी लहानगा होतो. तिच्या दुख्खाने त्याचा गळा भरून येतो तेव्हा प्रश्न पडतो हाच का तो इसबला परास्त करणारा योध्धा?
त्याच्या कामगीरिचा सर्वोच्च बिन्दू चाळीशीतच यायचा होता ९\१२ ला मुम्बईवर आतन्कवादी हल्ला झाला तेव्हा रातोरात जावून त्याने अनेकान्चे प्राण वाचवले, स्वतह १००० जखमा अन्गावर घेतल्या पण कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धिला पूर्ण पणे नकार दिला.’मी माझ्या CP ना अहवाल दिला आहे इतराना काही सान्गायची गरज नाही I have done my duty that is all' तो म्हणत होता. मागील वेळी मुम्बई फिरण्याचा प्रसन्ग आणि आज ही जखमी अवस्था, सगळेच जण भाव विवश झाले होते. पण बापू शान्त होता. क्वचित विनोद देखील करत होता.एवढे असून त्याला म्रुत्युच्या तोन्डात नेणार्या ईसाब बद्दल त्याच्या मुखात एकही वाइट शब्द न्हवता!
"वाइट एवढच वाटते प्रसाद कि भारतमाता पुन्हा एकदा रक्त मागत आहे आणि ते देणारा एकही लाल तिच्या उदरी जन्म घेत नाहीये" असे जेव्हा बापू म्हणतो तेव्हा त्याला खूप weightage नक्किच असते!
इनामदारान्चा उल्लेख तो saint in vardee असा करत असला तरी ते वर्णन त्याला पूर्णपणे लागू पडते.
बापू तुला सर्वान्च्या वतीने १ कडक पोलिसि salute .
Comments