Posts

Showing posts with the label गणपती

धर्म, गणपती, हिंदू, मुस्लिम...compilation of thoughts about religions.

Image
* धर्मासंबंधी चार वेगवेगळ्या विचारांचे स्फूटलेखन -  * एकाच पोस्टमध्ये देत आहे. ■ 1 सलीम खान आणि गणपती :  सलीम खान यांनी असे सांगितले की; " त्यांची पत्नी महाराष्ट्रीयन असल्याने घरी गणपती बसविण्यास सुरुवात झाली. पुढे मी पत्रकारांना घरच्या उत्सवाचे चित्रीकरण करण्यास परवानगी दिली. याचे कारण म्हणजे मला हेच दाखवून द्यायचे होते की; प्रत्येक मुसलमान हा मूर्तीभंजक, जिहादी, आतंकवादी वा दुसऱ्याच्या धर्माची विटंबना करणारा नसतो. " ● यावर प्रतिपक्षाचे म्हणणे असे की; ' पण आम्ही सरसकट विश्वास ठेवू शकत नाही. ' ● हिंदूंनी समजून घेण्याची गोष्ट अशी की; सलीम, प. सुलताना अशी यादी काढत गेले तर पुष्कळ होते.  मुस्लिमांनी समजून घेण्याची गोष्ट अशी की; त्यांनी पुढे येऊन अशा काही गोष्टी करायला हव्यात की; ज्यामुळे विश्वास व सौहार्द निर्माण होईल. ■ 2 हिंदू आणि गणपती: अशी अनेक उदाहरणे दिसतात की; खूप देव देव करणारे हिंदू देखील नीट वागत नाहीत. ● त्याबद्दल माझे निरीक्षण असे आहे की; केवळ देव देव करून किंवा वाचन करून धर्म अंगात मुरत नाही. त्यासाठी स्वतःच स्वतःवर काम करावे लागते. आणि तसे काम केले तरी त्य...

गणेश प्रतिष्ठापना का गूढार्थ |

Image
श्री. गणपती प्रतिष्ठापना करताना जाणवते की आपल्या कडे परब्रम्ह परमात्मा यासंबंधी जे प्रचंड व्यापक विचार आहेत ते अत्यंत सोप्या पद्धतीने आपण एका पार्थिव मूर्तीत ओततो. म्हणजे च की त्या मातीच्या मूर्तीत आपण परब्रम्ह तत्व प्रस्थापित करतो / कल्पितो. त्यालाच प्रतिष्ठापना असे म्हणतात. तसेही ते तत्व जळी स्थळी काष्ठी पाषाणी असतेच. पण आपल्या लाडक्या मूर्तीत ते पहायला सोपे जाते. अर्थात हे समजून पूजा करायला हवी तर च होईल.     अथर्वशीर्षात पण लिहिले आहे की हे गणेशा तूच साक्षात आत्मा आहेस. ऋषी मुनींनी मूर्तिपूजेच्या माध्यमातून आपल्याला मूळ तत्व कळायला किती सोप्पे केले आहे नाही का ?  🕉 वैद्य प्रसाद फाटक ९८२२६९७२८८