गणेश प्रतिष्ठापना का गूढार्थ |
श्री. गणपती प्रतिष्ठापना करताना जाणवते की आपल्या कडे परब्रम्ह परमात्मा यासंबंधी जे प्रचंड व्यापक विचार आहेत ते अत्यंत सोप्या पद्धतीने आपण एका पार्थिव मूर्तीत ओततो. म्हणजे च की त्या मातीच्या मूर्तीत आपण परब्रम्ह तत्व प्रस्थापित करतो / कल्पितो. त्यालाच प्रतिष्ठापना असे म्हणतात.
तसेही ते तत्व जळी स्थळी काष्ठी पाषाणी असतेच. पण आपल्या लाडक्या मूर्तीत ते पहायला सोपे जाते. अर्थात हे समजून पूजा करायला हवी तर च होईल.
अथर्वशीर्षात पण लिहिले आहे की हे गणेशा तूच साक्षात आत्मा आहेस. ऋषी मुनींनी मूर्तिपूजेच्या माध्यमातून आपल्याला मूळ तत्व कळायला किती सोप्पे केले आहे नाही का ?
🕉 वैद्य प्रसाद फाटक ९८२२६९७२८८
Comments
गणपतीचे रुपडे तर सर्वाना माहीत आहेच पण ते परमात्म स्वरूप कसे आहे ? ते दिशा व काल दृष्ट्या अनंत आहे. म्हणजे जसे गव्हाचे झाड १ वर्ष, कुत्रा १० वर्ष माणूस 100 वर्ष काळ अस्तित्वात असतो तसे ते अनंत काळ असते. अर्थात त्याला जन्म मृत्यू नाही.
विभिन्न देश दिशेने बांधले जातात तसे ते नाही. सर्व व्यापी आहे. उदाहरणार्थ भारत उत्तरेला हिमालय व दक्षिणेला सागरपर्यंत मर्यादित आहे वगैरे तसे ते नाही. त्यामुळे ते अपार आहे. आणि त्यामुळेच त्याला गोल चौकोन वगैरे आकार ही नाही.
ते absolute सत्य आहे. Real आहे.सतत अस्तित्वात आहे. त्याला कसलेच देणे घेणे नाही त्यामुळे ते त्रयस्थ साक्षीभावाने असते.
ते जाळले, कापले, भिजले or सुकले जाऊ शकत नाही.
ते चैतन्यमय आहे म्हणजे dull जड वगैरे नाही तर उत्साही आहे.
ते आनंदाची खाण आहे. नुसत्या आकाशाकडे पाहिले तरी किती छान वाटते ? हे तर त्यालाही व्यापून आहे मग किती प्रचंड आनंद देणार नाही का ?
ते पृथ्वी पाणी आकाश नाही पण त्याला व्यापून असल्याने सर्वत्र आहे.
त्याला निर्गुणत्व आहे म्हणजे ते सुंदर ओंगळ वगैरे नाही.
ते तत्व जसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी असते म्हणजे तुमच्या आमच्यात देखील असते. सगळ्यां प्राणिमात्रांच्यात च ते आहे.
या परमात्म्याला या शब्दांनी थोडेसे जाणण्याचे काम आपले. बाकी कर्ता करविता तोच गजानन आहे. 🕉️
By Dr. Prasad Phatak. 9822697288