सौहार्द हेच सर्वात जास्त हितकर आहे. विवेकानंदांची शिकवण.
■■ स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना करताना देखील सौहार्द या गोष्टीला हायलाईट केले होते. बघा त्यांच्या या पुस्तकातील उतारा. पुस्तक : श्री विवेकानंद चरित्र अर्थ : ●बेलूर-मठाच्या उद्दिष्टांबद्दल विवेकानंद स्वामी म्हणाले: 'हे एक असे केंद्र असेल जिथे श्री रामकृष्णांच्या जीवनात दाखवल्याप्रमाणे सर्व पंथ आणि श्रद्धा यांच्यातील भव्य सुसंवाद साधला जाईल आणि त्याचे आचरण केले जाईल. आणि केवळ त्याच्या वैश्विक पैलूमध्ये धर्माचा उपदेश केला जाईल. आणि या ठिकाणाहून वैश्विक सहिष्णुतेच्या हेतुपूर्वक सद्भावना, शांती आणि सौहार्दाचा तेजस्वी संदेश निघेल. जो संपूर्ण जगात पसरेल. जर आपण निष्काळजी झालो तर सांप्रदायिकता पसरण्याच्या धोक्याबद्दल त्यांनी सर्वांना इशारा दिला. धर्माचा अर्थ प्रजा धारण करणारा तो धर्म. उध्वस्त करणारे ते अधर्म. सौहार्दा अभावी ती उध्वस्त होत आहे. हे बदलायला हवे. ■ दरवर्षी मला हा अनुभव येतो - काही बांधव दिवाळीच्या शुभेच्छा देतात किंवा वर्षभरात कुठल्यातरी हिंदू सणाच्या शुभेच्छा देतात. ● या व्यतिरिक्त आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतो...