मानवतेला देव, धर्म यांची पूर्व अट नाही.
सहज एक आठवण सांगत आहे -
● शिकागो च्या Flight वर मला एक पोलंडचा नागरिक भेटला होता. तो नास्तिक आहे. त्याने असे म्हटले की; माणुसकीने वागण्यासाठी मला कुठल्याही देवाची, धर्माची गरज नाही. देव, धर्म हे माणसाला चांगल्या मार्गावर आणतात हे ठीक आहे. पण काही वेळा वाद आणि भांडणाला निमित्त होऊन बसतात.
● धार्मिक, नास्तिक, निधर्मी, ex muslims, कम्युनिस्ट ...अशा सगळ्यांपर्यंत माणुसकीचा विषय पोहोचवण्यासाठी जर नीट खटपट करायची असेल; तर असे विचार मांडले पाहिजेत की ज्यामध्ये देव धर्म राष्ट्र याची गरज पडणार नाही. Right?
● जग शांततेत राहण्यासाठी आणि माणसाची माणुसकी वाढण्यासाठी कृण्वन्तो विश्वं अर्यम्, islamization of world अशा कुठल्याही slogans ची गरज नाही. ती कदाचित दुसऱ्याला आपल्यामध्ये ओढण्याची वाक्य देखील ठरू शकतात आणि त्यामुळे संघर्ष होऊन माणुसकीला हानीच पोचू शकते.
आपापल्या धर्मात रहा, त्याचे पालन करा आणि धर्मात जी दुसऱ्यावर आक्रमणाची शिकवणूक असेल ती काढून टाका. पुढच्या पिढीला एक अधिक चांगलं जग देण्यासाठी हे उपयोगी ठरेल.
पोलंड च्या माणसाशी बोलत असताना iceland चे मनमोहक द्रुष्य दिसत होते होते; तो या पहिल्या फोटोतून दाखवत आहे. 👇
Comments