one literary try here.

क्षण एक पुरे जगण्याचा ! रोज सकाळी उठल्यावर आपण कितीतरी गुड मॉर्निंग चे मेसेज वाचतो आणि ती गुड असते देखील पण आजची रविवारची माझी सकाळ व्हेरी व्हेरी स्पेशल झाली । हल्ली रोज मी चक्क पहाटे उठून टेरेस वर जातो आणि व्यायाम करतो । लै धमाल असते राव । पण आज रविवार म्हणून व्यायामाला जरा सुट्टी घ्यायचा विचार आला / पण टेरेस चा विचार काही स्वस्थ बसू देई ना ... मग ठरवलं मस्त पैकी चहा घेऊन वर जाऊ या मग काय लग्गेच अंमलबजावणी । मी चहा, सतरंजी, सॅनीटाईझर अशी सगळी गॅंग पोचलो वर । आहाहा काय क्षण पकडलास पश्या, मी स्वतःलाच शाबासकी दिली । मंद वारा, पक्षांचे थवे चिवचिवत आहेत आणि नुकताच वर येणारा तो पूर्वेचा लाल मंद तेजाचा गोळा आणि हातात चहाचा कप.... खल्लास दिल खुश हो गया । माझे व चहा चे कित्येक क्षण असे गुगल फोटोज वर नसतील पण या मानेवरच्या कम्प्युटर ला असे काही फीड आहेत ना की बस ! त्यात मुख्य आहे पन्हाळ्याच्या तबक बागे समोर च्या टपरी वरचा चहा । मी एवढ्याशा कपातुन घुटके घेतोय, समोर नाना प्रकारचे पक्षी मंडळी ये जा करताहेत, हर प्रकारचे आवाज आणि त्यांचे जमिनीत चोच खुपसून दाणे टिपणे । आणि मग पुन्हा ...