उपनिषद दहा भागांचे सार
*डॉक्टर पल्लवी जोशी* यांनी मी गेल्या १५ दिवसात पोस्ट केलेल्या उपनिषद च्या दहा भागांचे सार किंवा महत्वपूर्ण मुद्दे खूप छान शब्दात लिहून पाठवले आहे ते पुढील प्रमाणे : - 🙏🙏सर, आपण लिहिलेल्या उपनिषदातील पहिल्या दहा भागामध्ये मला जे कळले ते पुढील प्रमाणे लिहीत आहे- आपण सगळ्यात छान म्हणजे पहिल्यांदा हे लिहिले आहे की आपण कोणी गुरु, संत ,माहात्मे नाही आहात, म्हणजे तो अहंकार येथे अजिबात नाही, यामुळे इथे आपल्या लिखाणातून विनम्रता दिसून येते. ज्ञान असूनही त्याचा कोणताही गर्व अभिमान नसणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. जे आपल्याला चांगले कळलेले आहे ते समोरच्याला कळावे, त्याचा उद्धार व्हावा, त्याच्या मनात चांगले विचार निर्माण व्हावेत, समाज चांगला घडावा म्हणून हा प्रयत्न आहे हे मला सगळ्यात जास्त भावले. प्रत्येक माणसाने आपल्या वयाची ठराविक वर्षे पूर्ण झाली व जबाबदाऱ्या कमी झाल्या की समाजासाठी म्हणून काही देणे लागते, ज्याला जे शक्य आहे त्याने ते त्या प्रमाणात समाजाला द्यावे, आपण उपनिषदांचा सोपा साधा करून सांगत असलेला अर्थ खरच येणाऱ्या पिढीसाठी वाचनीय आहे यात शंका न...