उपनिषद दहा भागांचे सार
*डॉक्टर पल्लवी जोशी*
यांनी मी गेल्या १५ दिवसात पोस्ट केलेल्या उपनिषद च्या दहा भागांचे सार किंवा महत्वपूर्ण मुद्दे खूप छान शब्दात लिहून पाठवले आहे ते पुढील प्रमाणे : -
🙏🙏सर,
आपण लिहिलेल्या उपनिषदातील पहिल्या दहा भागामध्ये मला जे कळले ते पुढील प्रमाणे लिहीत आहे-
आपण सगळ्यात छान म्हणजे पहिल्यांदा हे लिहिले आहे की आपण कोणी गुरु, संत ,माहात्मे नाही आहात, म्हणजे तो अहंकार येथे अजिबात नाही, यामुळे इथे आपल्या लिखाणातून विनम्रता दिसून येते. ज्ञान असूनही त्याचा कोणताही गर्व अभिमान नसणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. जे आपल्याला चांगले कळलेले आहे ते समोरच्याला कळावे, त्याचा उद्धार व्हावा, त्याच्या मनात चांगले विचार निर्माण व्हावेत, समाज चांगला घडावा म्हणून हा प्रयत्न आहे हे मला सगळ्यात जास्त भावले.
प्रत्येक माणसाने आपल्या वयाची ठराविक वर्षे पूर्ण झाली व जबाबदाऱ्या कमी झाल्या की समाजासाठी म्हणून काही देणे लागते, ज्याला जे शक्य आहे त्याने ते त्या प्रमाणात समाजाला द्यावे, आपण उपनिषदांचा सोपा साधा करून सांगत असलेला अर्थ खरच येणाऱ्या पिढीसाठी वाचनीय आहे यात शंका नाही.
जे जे या सृष्टी मध्ये घडत आहे, घडणार आहे, ते घडवणारा एकमेव परमेश्वर आहे. आपण मी केलं, मी करणार आहे हा व्यर्थ अभिमान बाळगतो. त्याचबरोबर जे आपण करू शकत नाही त्याच्यासाठी व्यर्थ चिंता करतो! जर कर्ता करविता परमेश्वर आहे हे स्विकारले तर आपल्या हातात काही उरत नाही, जे आहे ते ईश्वराचे आहे, असे समजून शांत राहणेच योग्य होईल. इथे प्रयत्न करण्यास हरकत नाही पण असे झालेच पाहिजे हा हट्ट मात्र उपयोगाचा नाही.
आत्मशुद्धीच्या गोष्टी सांगताना परमेश्वर इतरत्र आहे, सर्वत्र भरून आहे, पण त्याचबरोबर तो आपल्या अंतरात्म्यामध्ये वास करून आहे, त्याचा शोध घेऊन ती अनुभूती अनुभवणे हेच आपले इति जीवन कर्तव्य आहे असे मला वाटते.
परमेश्वर हा आनंदी, तेजस्वी , त्याचबरोबर कोणतीही वासना नसणारा असा परमानंद आहे. त्याला शोधणे आणि त्याच्या पर्यंत पोहोचणे हेच जीवनाचे, मनुष्य जन्माचे इति कर्तव्य आहे. आपण सगळ्या गोष्टी करत असताना या गोष्टींकडे दुर्लक्ष होतो.
साधे सोपे जीवन जगत असताना आनंदी कसे राहता येईल, दुसऱ्याला आपला कसा उपयोग करून देता येईल, संसार करत असताना थोडीशी अध्यात्माची जोड देऊन मनःशांती कशी मिळवता येईल व परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपली आत्मशुद्धी कशी करता येईल याचे छान ज्ञान उपनिषदामधून दिले गेले आहे.
आपण खूप मोजक्या शब्दात अतिशय उत्तम माहिती शब्दबद्ध केली आहे.
मनापासून नमस्कार🙏🙏 धन्यवाद🙏🙏
~ dr pallavi joshi.
धन्यवाद जोशी मॅडम.
~ प्रसाद फाटक...
Comments