Posts

Showing posts with the label literature

one literary try here.

Image
क्षण एक पुरे जगण्याचा ! रोज सकाळी उठल्यावर आपण कितीतरी गुड मॉर्निंग चे मेसेज वाचतो आणि ती गुड असते देखील पण आजची रविवारची माझी सकाळ व्हेरी व्हेरी स्पेशल झाली ।  हल्ली रोज मी चक्क पहाटे उठून टेरेस वर जातो आणि व्यायाम करतो । लै धमाल असते राव । पण आज रविवार म्हणून व्यायामाला जरा सुट्टी घ्यायचा विचार आला / पण टेरेस चा विचार काही स्वस्थ बसू देई ना ... मग ठरवलं मस्त पैकी चहा घेऊन वर जाऊ या मग काय लग्गेच अंमलबजावणी । मी चहा, सतरंजी, सॅनीटाईझर अशी सगळी गॅंग पोचलो वर । आहाहा काय क्षण पकडलास पश्या, मी स्वतःलाच शाबासकी दिली । मंद वारा, पक्षांचे थवे चिवचिवत आहेत आणि नुकताच वर येणारा तो पूर्वेचा लाल मंद तेजाचा गोळा आणि हातात चहाचा कप.... खल्लास दिल खुश हो गया ।  माझे व चहा चे कित्येक क्षण असे गुगल फोटोज वर नसतील पण या मानेवरच्या कम्प्युटर ला असे काही फीड आहेत ना की बस !  त्यात मुख्य आहे पन्हाळ्याच्या तबक बागे समोर च्या टपरी वरचा चहा । मी एवढ्याशा कपातुन घुटके घेतोय, समोर नाना प्रकारचे पक्षी मंडळी ये जा करताहेत, हर प्रकारचे आवाज आणि त्यांचे जमिनीत चोच खुपसून दाणे टिपणे । आणि मग पुन्हा ...

धर्म साहित्य आणि मानवता

Image
पुणे : '' सर्व धर्म एक असून सर्व धर्मांचा केंद्रबिंदू मानव आहे. मानव कल्याणासाठी शाश्वत साहित्याची गरज आहे. संस्कृतीमधील एकता मानवतेला पुण्यशील ठरावी, यासाठी साहित्यनिर्मिती होत असते. " इति डॉ. श्रीपालजी सबनीस. यात वक्त्याने 2 गोष्टी घेतल्या आहेत.  १. धर्म आणि २. साहित्य या दोन्हीतून मानवतेची जोपासना व्हावी यावर भर दिला आहे. मला वाटते की यासाठी कृती कार्यक्रम म्हणून सर्वप्रथम आपण जे धर्म मानणारे लोक आहोत, तसेच जे साहित्यिक किंवा वाचक आहेत; या आपण सर्वांनी आपल्या अंगी मानवतेचे गुण बाणायला हवेत. आणि simultaneously इतरांनाही आवाहन करायला हवे. की बाबांनो आणि बायांनो ह्या मार्गानेच खरे सुख मिळेल. पैसा प्रसिद्धी जरी कितीही मिळाली तरी गैर मार्गाने असेल तर दुःखच आणणार. दुसऱ्याला त्रास दिला की आपल्याला पण होणारच. म्हणून मानवतेचा मार्ग धरूया. 🙏 ☦️☪️🕉️