Posts

Showing posts with the label विश्व

माझे जीवन गाणे एक सहज अभिव्यक्ती भाग तीन :

Image
माझे जीवन गाणे एक सहज अभिव्यक्ती भाग तीन : यापूर्वी मी तुम्हाला दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्यावर मला कसा विश्वरूप दर्शनाचा अनुभव आला ते सांगितले.  खरे विश्वरूपदर्शन हे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला दाखवलं होतं तेही आपल्याला माहिती आहे. आणखीन ज्यावेळेला यशोदा मातेने कृष्णाला म्हंटले की तू चोरून लोणी खाल्लं आहेस; चल आ करून दाखव. तेव्हा कृष्णाने मोठ्ठ तोंड उघडलं आणि मातेस सारं विश्व त्याच्यामध्ये दिसलं.  आपण कधी शांत बसलो किंवा ध्यानाला बसलो तर त्या विष्णूच्या आकारातून हळूहळू संपूर्ण विश्व कल्पनेत आणायचं. आमच्या गुरूंनी सांगितलं की आकाशावर ध्यान करा. इथे तर आकाश तुकड्यांनी दिसतं, तारांनी व्यापलेला दिसतं. म्हणून समुद्र काठावर ध्यान केलं. अफाट आकाश दिसलं त्याच्यामध्ये नारायण मोठा मोठा होत गेला. मग डोंगराच्या माथ्यावर जाऊन महाबळेश्वरला केलं. मग विमानात केलं. 11 किलोमीटर वरती गेलोय. ह्या सगळ्यातून असं लक्षात आलं की; जे आकाश आपण इथून खालून बघत होतो त्या आकाशात अकरा किलोमीटर वरती गेलोय तरीसुद्धा शेवट विस्तार एवढा की; आपल्याला विनाअडथळा दिसते म्हणून सगळे काही दिसण...

मानवतेला देव, धर्म यांची पूर्व अट नाही.

Image
     सहज एक आठवण सांगत आहे -  ● शिकागो च्या Flight वर मला एक पोलंडचा नागरिक भेटला होता. तो नास्तिक आहे. त्याने असे म्हटले की; माणुसकीने वागण्यासाठी मला कुठल्याही देवाची, धर्माची गरज नाही. देव, धर्म हे माणसाला चांगल्या मार्गावर आणतात हे ठीक आहे. पण काही वेळा वाद आणि भांडणाला निमित्त होऊन बसतात. ● धार्मिक, नास्तिक, निधर्मी, ex muslims, कम्युनिस्ट ...अशा सगळ्यांपर्यंत माणुसकीचा विषय पोहोचवण्यासाठी जर नीट खटपट करायची असेल; तर असे विचार मांडले पाहिजेत की ज्यामध्ये देव धर्म राष्ट्र याची गरज पडणार नाही. Right? ● जग शांततेत राहण्यासाठी आणि माणसाची माणुसकी वाढण्यासाठी कृण्वन्तो विश्वं अर्यम्, islamization of world अशा कुठल्याही slogans ची गरज नाही. ती कदाचित दुसऱ्याला आपल्यामध्ये ओढण्याची वाक्य देखील ठरू शकतात आणि त्यामुळे संघर्ष होऊन माणुसकीला हानीच पोचू शकते. आपापल्या धर्मात रहा, त्याचे पालन करा आणि धर्मात जी दुसऱ्यावर आक्रमणाची शिकवणूक असेल ती काढून टाका. पुढच्या पिढीला एक अधिक चांगलं जग देण्यासाठी हे उपयोगी ठरेल. पोलंड च्या माणसाशी बोलत असताना iceland चे मनमोहक द्रुष्य दि...

ईश्वराची लीला अफाट त्याचा पसारा अफाट.

■ अरेच्चा केवढेसे चिमुकले आहोत आपण... आणि अहंकार तर केवढा मोठ्ठा ⁉️ [ 👇ही पोस्ट निसर्ग फक्त सौंदर्य दाखवण्यासाठी नाही तर एका विचारासाठी आहे ] ● " जसं जसं आपण आकाशात उंच उंच जातो तसं तसं आपलं जे खालचं अस्तित्व आहे ते आणखी आणखी छोटं होत जातं. केवढे टिल्लू पिल्लू आहोत आपण❗️ विमानाचे हजार फूट आणि आणखीन काही हजार फूट एवढ्या अंतरावरून आपलं अस्तित्व इतकं छोटं असल्याचे कळत जातंय तर या जगाच्या अफाट पसाऱ्यात आपण असून नसून सारखेच आहोत नाही का? " ● ■ एवढंसं आपलं अस्तित्व आणि केवढा मोठा अहंकार ❓️ तो मात्र आभाळभर होत चाललाय. उलटंच आहे की हे! अस्तित्व चिमूटभर अहंकार आकाशभर अशी आपली परिस्थिती होत आहे ‼️