Posts

Showing posts with the label साहित्य

पाश्चात्य संस्कृती नेमकी कशी होती? western culture.

Image
पाश्चात्त्य संस्कृती म्हणजे नक्की काय याचा मागवा घेत होतो. अर्थात आज जे काही आपल्यासमोर पाश्चात्य जग उभं आहे; त्याला संपूर्णपणाने पाश्चात्य संस्कृती असे म्हणता येणार नाही. ती पाश्चात्य संस्कृतीची आजची व्हर्जन आहे. त्यामुळे पूर्व काळातील पाश्चात्त्य संस्कृतीचे काही ज्ञान होते का? असे बघत होतो. त्या संबंधाने जे काही थोडेफार वाचन झाले त्यातली ही काही पुस्तके आहेत. त्यांच्या अनुषंगाने निरीक्षणे नोंदवणार आहे. अधिकृत साहित्य हे निश्चितच समाजाचा आरसा असते. त्यामुळे या इंग्लिश क्लासिकल्स चा विचार त्या अर्थाने केला असता चुकीचा होणार नाही असे वाटते. जरी शंभर टक्के ठोसपणाने सांगता येत नाही; कारण काळ वेगळा आहे तरी चांगला अंदाज तर नक्की येत आहे. यातले अर्थातच पहिले पुस्तक बायबल आहे. - 0001 सेन्स अँड सेन्सिबिलिटी व प्राईड अँड प्रिज्युडिस - 1805. मग शांता शेळके यांनी अनुवादित केलेलं लिटल वुमेन हे अमेरिकन जीवनाबद्दल आहे 1868. द पोर्ट्रेट ऑफ लेडी 1885. चार्ली चापलीन जीवन चरित्र 1900 च्या पुढे.  डायरी ऑफ अना फ्रेंक 1939. या सर्वांमधून असं दिसतं की उच्च अभिरुची असणारी ही संस्कृती होती. बे...

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

Image
                   मानवतेची महागाथा          मला उमजलेली मानवता आपल्यासमोर मांडत आहे. हे माझ्या अल्प बुद्धी ला सुचलेले विचार आहेत. आपण यावर विचार करा व पटेल तेव्हढे स्वीकारा व पसरावा. जे पटले नाही ते सोडून द्या. सर्वांचे सर्व मुद्यांवर संपूर्ण एकमत कधी होत नसते. नवरा बायको आई मुलगा यांचे देखील होत नसते. इतरांची तर काय कथा ? हे विचार कसे व कुठून आले त्याची पूर्व पिठीका : मी खूप वेळा बोलत असतो, तशी माझी दोन मने देखील कधी कधी आपसात बोलत असतात ! असाच एक संवाद प्रकट करतोय. मन १ व मन २ अशी सोप्पी नावे देतोय त्यांना. ...  मन १ - तुला आठवतं का ?  मन २ - काय रे ?   मन १ - बरोबर ४६ वर्ष झाली तू एका बाईंच्या अन्यायाची तक्रार घेऊन शाळेचे सुपरवायझर श्री. कुलकर्णी सरांकडे गेलास तेव्हा ते काय म्हणाले ?  मन २ - आठवतंय की. ते म्हणाले की तुझी तक्रार नंतर सांग. पण आधी तू काय आहेस ते बघ ? तू काय तुकारामाचा अवतार लागून गेलास काय ? ...

रामायण कथा की इतिहास ?

Image
रामायण इतिहास नव्हे कथा ? मध्यंतरी एका जिवलगाने अचानक संपर्क तोडला तेव्हा मला जी मायुसी आली तेव्हा माझी पक्की खात्री झाली की रामायण हे काव्य आहे. रामायण हे थोडी  बहुत कल्पना आहे, आणि त्यातून निर्माण झालेली कथा आहे. इतिहास न्हवे ? किंवा सत्यावर आधारित कादंबरी असते तसे आहे. एक छोटासा कथा लेखक म्हणून मला हे समजू शकते की लेखकाची स्वतःची व भोवतालची अनुभूती कथेतून व्यक्त होत असते. तसंच काहीसं इथे दिसतं आहे. राजा राम होऊन गेले असतील त्यांनी मोठा पराक्रम केला असेल. म्हणूनच शिवरायांवर जशा कादंबऱ्या झाल्या तसेच त्यांच्यावर रामायण लिहिणे झाले.  प्रभूंना जो शोक झाला ते प्रकरण वाचलं का ? स्वतः परब्रम्ह हे बायको हरवल्यावर इतकं दुःखी होईल ? उपनिषदे काय सांगतात; की मला जन्म नाही, मृत्यू नाही मग कसली चिंता आणि कसला शोक ?  प्रभूंचे हे human nature लेखकाने अनुभवाने + कल्पनेने रंगवले असल्याने असे वर्णन आले असणार. आणखी एक प्रश्न ? परब्रम्ह हे एकदा  सीतेला 14 वर्षांचा  शिक्षा नसताना आपणहून भोगलेल्या वनवासानंतर  अग्निदिव्य देखील केलेल्या माउलीला  केवळ धोब्याच्या बडबडीवरून पु...