Posts

Showing posts with the label शीख

अति तेथे माती.

Image
हिंदूंवर हजार वर्षात अन्याय, अत्याचार व जबरदस्तीने धर्मांतर झाले. त्यामुळे हिंदू धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न हे योग्यच आहेत व ते यशस्वी होताना ही दिसत आहेत. त्यासाठी सामाजिक, धार्मिक व राजकीय काम केले गेले. आता या यशानंतर गरजेचे आहे ते म्हणजे ' अतिरेक ' होऊ न देणे. यशाच्या आनंदात असे ' अति ' होऊ लागले आहे असे दिसत आहे. भल्या भल्यांची ' अति तेथे माती ' ही म्हण कशी सार्थ झाली हे लक्षात घेता ' अति सर्वत्र वर्जयेत ' हे सुभाषित जगणे गरजेचे आहे. आता हे ' अति म्हणजे किती ? ' हे मी माझ्या 60 पैकी 45 वर्षांच्या सामाजिक कार्यातील व इतिहासाच्या अभ्यासातून अंदाज केला आहे.  मी चुकत असेल तर सोडून द्या पण मुद्दा तर लक्षात ठेवा. पुढे उपयोगाला येईल.  अति करणारे आणि जातीत फूट पाडणारे दोन्ही वेगळे वेगळे लोक आहेत. प्रत्येकाने मानवता सर्वात प्रधान स्थानी ठेवली की गोष्टी बदलतील.  आणि एक असे आहे की हिंदू धर्म टिकून राहण्यासाठी 4 गोष्टी अजूनही लागणार आहेत. कारण काही लोकांची बाबर वृत्ती अजूनही संपलेली नाही. कालचे ओवैसी चे संसदेतील भाषण बाबरी झिंदाबाद ने सुरू झाले. हिमाचल म...

भारत हिंदुराष्ट्र आहे ❓

Image
⚛️ 1.भारत हे हिंदुराष्ट्र आहे ⁉️ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री.दत्ताजी होसबळे यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा दाखल देत भारत हे हिंदुराष्ट्र होते, आहे व असेल असा उद्घोष केला आहे. डॉक्टर साहेबांनी देखील हा उद्घोष केला होता हे ही सत्य आहे. तसेच हिंदुस्थान हे देखील भारताचे च नाव आहे हे ही सत्य आहे.  पण.... जर इतिहास व वर्तमानाचा मागोवा घेतला तर मात्र काही वेगळे वास्तव समोर येईल. ऐतिहासिक काळात देखील येथे हिंदू बाहुल्य होते. परंतु जरी ते या मातीतीलच धर्म असले तरी येथे बौद्ध व जैन हे वेगळे धर्म होते व त्यांचे जनलोक मोठ्या संख्येने अस्तित्वात होते. कित्येक बौद्ध व जैन यांना हिंदू धर्माबद्दल आस्था व काही हिंदू रीतिरिवाज पाळणे किंवा हिंदू दैवतं पुजणे हे घडतही आले आहे. अशा प्रकारचे सांस्कृतिक मिश्रण जगभरात सर्वत्र होत असते. परंतु हे दोन्ही धर्म पूर्णतः स्वतंत्र धर्मच राहिले आहेत. त्यांनी आपले अस्तित्व कधीही हिंदू धर्मात विलीन केलेले न्हवते आणि नाही. म्हणजेच पूर्वीदेखील भारत हा अनेक धर्मीय देश होता. नंतर मात्र बाहेरून आले ते मुसलमान आणि ख्रिस्ती आक्रमक. त्यांचा विस्तारव...