अति तेथे माती.
हिंदूंवर हजार वर्षात अन्याय, अत्याचार व जबरदस्तीने धर्मांतर झाले. त्यामुळे हिंदू धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न हे योग्यच आहेत व ते यशस्वी होताना ही दिसत आहेत. त्यासाठी सामाजिक, धार्मिक व राजकीय काम केले गेले.
आता या यशानंतर गरजेचे आहे ते म्हणजे ' अतिरेक ' होऊ न देणे.
यशाच्या आनंदात असे ' अति ' होऊ लागले आहे असे दिसत आहे. भल्या भल्यांची ' अति तेथे माती ' ही म्हण कशी सार्थ झाली हे लक्षात घेता ' अति सर्वत्र वर्जयेत ' हे सुभाषित जगणे गरजेचे आहे.
आता हे ' अति म्हणजे किती ? ' हे मी माझ्या 60 पैकी 45 वर्षांच्या सामाजिक कार्यातील व इतिहासाच्या अभ्यासातून अंदाज केला आहे.
मी चुकत असेल तर सोडून द्या पण मुद्दा तर लक्षात ठेवा. पुढे उपयोगाला येईल. अति करणारे आणि जातीत फूट पाडणारे दोन्ही वेगळे वेगळे लोक आहेत. प्रत्येकाने मानवता सर्वात प्रधान स्थानी ठेवली की गोष्टी बदलतील.
आणि एक असे आहे की हिंदू धर्म टिकून राहण्यासाठी 4 गोष्टी अजूनही लागणार आहेत. कारण काही लोकांची बाबर वृत्ती अजूनही संपलेली नाही. कालचे ओवैसी चे संसदेतील भाषण बाबरी झिंदाबाद ने सुरू झाले. हिमाचल मध्ये कायदेशीर कारवाई होऊ दिली नाही. पोलिसांवर हल्ला झाला. केरळात मोर्चा मध्ये 15 मिनिटे पोलीस हटवा चे नारे लागले. धर्मांधांनी बदलायला हवेच आहे तरच शांती व मानवता स्थापित होइल.
Comments