Posts

Showing posts with the label साक्षात्कार

पुढे ठाकला पांडुरंग

Image
येथेच माझा नारायण केशव विठ्ठल पांडुरंग प्रकटला - हे तर अल्बम मधून शोधून काढलेले जुने फोटोज आहेत. दिवे आगर या गावातले. सलग ५ किमीचा स्वच्छ, सुंदर आणि शांत किनारा लाभलेले कोकणातील एक गाव. मावशीच्या घरातून निघाल्यावर दोन्ही बाजूला अशा उंच उंच माडाच्या वाड्यांमधून जाणारा लाल मातीचा वळणांचा रस्ता. मग भगवान विष्णूंचं एक सुंदर मंदिर. मग लागतंय केतकीचं हिरवं पिवळं बन आणि मग येतो कधी एकदा डोळे भरून पाहतो असा पण डोळ्यात न मावणारा तो अथांग सागर. तो दिसतानाच काय पण आता तो क्षण आठवताना सुद्धा मनाला आनंदाचे उधाण येतंय. एक काळ असा होता की या किनाऱ्यावर मी तासन् तास बसलेलो आहे. कधी कधी अगदी एकटाच... संपूर्ण पाच किलोमीटरच्या स्ट्रेच मध्ये दुसरा एकही माणूस नाही मी एकटाच माणूस आहे... असं पण घडलेले आहे. तर असाच एका सुंदर सकाळी ह्याच किनाऱ्यावर पोहोचलो. आधी थोडं पाण्यात चालणं - पळणं झालं. वाळूच्या एका छोट्याशा उंचवट्यावर बसून पाण्यात पाय सोडले आणि शांतपणे बसलो. दर मिनिटाला किनाऱ्यावर आदळणाऱ्या शुभ्र फेसाळत्या लाटांनी अंगावर काटा येत होता. त्यानंतर लक्ष गेलं ते किनाऱ्यापासून आत दूरवर पसरलेल्या श...