रामायण कथा की इतिहास ?

रामायण इतिहास नव्हे कथा ? मध्यंतरी एका जिवलगाने अचानक संपर्क तोडला तेव्हा मला जी मायुसी आली तेव्हा माझी पक्की खात्री झाली की रामायण हे काव्य आहे. रामायण हे थोडी बहुत कल्पना आहे, आणि त्यातून निर्माण झालेली कथा आहे. इतिहास न्हवे ? किंवा सत्यावर आधारित कादंबरी असते तसे आहे. एक छोटासा कथा लेखक म्हणून मला हे समजू शकते की लेखकाची स्वतःची व भोवतालची अनुभूती कथेतून व्यक्त होत असते. तसंच काहीसं इथे दिसतं आहे. राजा राम होऊन गेले असतील त्यांनी मोठा पराक्रम केला असेल. म्हणूनच शिवरायांवर जशा कादंबऱ्या झाल्या तसेच त्यांच्यावर रामायण लिहिणे झाले. प्रभूंना जो शोक झाला ते प्रकरण वाचलं का ? स्वतः परब्रम्ह हे बायको हरवल्यावर इतकं दुःखी होईल ? उपनिषदे काय सांगतात; की मला जन्म नाही, मृत्यू नाही मग कसली चिंता आणि कसला शोक ? प्रभूंचे हे human nature लेखकाने अनुभवाने + कल्पनेने रंगवले असल्याने असे वर्णन आले असणार. आणखी एक प्रश्न ? परब्रम्ह हे एकदा सीतेला 14 वर्षांचा शिक्षा नसताना आपणहून भोगलेल्या वनवासानंतर अग्निदिव्य देखील केलेल्या माउलीला केवळ धोब्याच्या बडबडीवरून पु...