रामायण कथा की इतिहास ?
रामायण इतिहास नव्हे कथा ?
मध्यंतरी एका जिवलगाने अचानक संपर्क तोडला तेव्हा मला जी मायुसी आली तेव्हा माझी पक्की खात्री झाली की रामायण हे काव्य आहे. रामायण हे थोडी बहुत कल्पना आहे, आणि त्यातून निर्माण झालेली कथा आहे. इतिहास न्हवे ? किंवा सत्यावर आधारित कादंबरी असते तसे आहे.
एक छोटासा कथा लेखक म्हणून मला हे समजू शकते की लेखकाची स्वतःची व भोवतालची अनुभूती कथेतून व्यक्त होत असते. तसंच काहीसं इथे दिसतं आहे.
राजा राम होऊन गेले असतील त्यांनी मोठा पराक्रम केला असेल. म्हणूनच शिवरायांवर जशा कादंबऱ्या झाल्या तसेच त्यांच्यावर रामायण लिहिणे झाले.
प्रभूंना जो शोक झाला ते प्रकरण वाचलं का ? स्वतः परब्रम्ह हे बायको हरवल्यावर इतकं दुःखी होईल ? उपनिषदे काय सांगतात; की मला जन्म नाही, मृत्यू नाही मग कसली चिंता आणि कसला शोक ?
प्रभूंचे हे human nature लेखकाने अनुभवाने + कल्पनेने रंगवले असल्याने असे वर्णन आले असणार.
आणखी एक प्रश्न ? परब्रम्ह हे एकदा सीतेला 14 वर्षांचा शिक्षा नसताना आपणहून भोगलेल्या वनवासानंतर अग्निदिव्य देखील केलेल्या माउलीला केवळ धोब्याच्या बडबडीवरून पुन्हा वनवास घडवेल ? परब्रम्ह हे सीतेचे सत्य स्पष्ट करून प्रजेला मार्ग दाखवते झाले असते.
राजा किती प्रजादक्ष सांगण्याचा नादात हे लिहिलं आहे अशी शंका येते.
प्रभू रामचंद्र म्हणजे अफाट अलौकिक व्यक्तिमत्त्व आपण किस झाड की पत्ती.
पण जे आपल्या मन बुद्धीला वाटलं ते असं की कुठेतरी काहीतरी चुकतंय ?
या कथेमधून आम्ही चांगलं तेच घेणार. राम हाच आमचा आराध्य आहे व रहाणार.
राम सीता व रावण मंदोदरी झाले असतील. राम सुष्ट आणि रावण दुष्ट असेल. त्यात राम विजयी देखील झाला असेल. धर्म रक्षण, सत्य रक्षण व प्रजा रक्षण केले असेल.
बाकी सगळं नुसतं महाकाव्य.
एकूण एक शब्द अंतिम प्रमाण न्हवे. काय म्हणता यावर ?
आपला, वैद्य प्रसाद फाटक पुणे 2
9822697288 **
Comments