महास्त्री व महापुरुष यांचे आदर्श
महास्त्री महापुरुष यांचे आदर्श -
मी नावाप्रमाणे प्रसाद म्हणजे काही गोष्टींसाठी साद घालणारा माणूस आहे. इतर आमच्या कुळातले लोक फाटक अडणावाप्रमाणे नाहीयेत; पण मी मात्र अडणावाप्रमाणे फाटका माणूस आहे.😂
म्हणून मी अधिक चांगला माणूस बनायचे ठरवतो आणि त्यासाठी मला साहित्य, संगीत, धर्म, अध्यात्म, घरचे संस्कार टिकवणे आणि महापुरुष व महास्त्रियांचे जीवन चरित्र या गोष्टी उपयोगी पडतात.
मित्र मैत्रीणींनो; तुम्हाला जर असे मानवाचे आदर्श पाहून स्वतःमध्ये काही बदल करायचे असतील तर माझ्या पुढील विचारांवर 👉 पण एकदा नजर टाका. 🙏
एखादे चरित्र ऐतिहासिक असो की पुराणातील वा कुराणातील असो ; त्यातून काहीना काही मिळतेच. ते अंगी बाणण्याचा प्रयत्न करायचा. आणि लक्षात हे ठेवायचे की ती देखील माणसेच आहेत. त्यांच्या गोष्टी आपण माणुसकीच्या भूमिकेवर घासून बघायच्या. आपल्या व्यक्तिमत्वाला काय सूट होईल / पटेल ते पण बघायचं, त्यातलं एक एक घ्यायचं आणि पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करायचा.
दत्तगुरूंनी तर 108 गुरू केले. तसे पदोपदी चांगले असेल ते वेचत जायचे.
एक सोपे उदाहरण देतो : आता व्यसनांचे जे काही स्वरूप झालेय ते पहाता हे हास्यास्पद वाटेल; पण आम्हाला लहानपणी ज्येष्ठ असे सांगत असत की, ' टिळकांचे ४ गुण घ्या... नुसते त्यांच्या सुपारीच्या व्यसनावर बोट ठेऊ नका.'😄
या 2/3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातून आपण कुठेतरी कणभर बरे व्यक्ती होऊ शकू.
आपला, डॉ प्रसाद फाटक पुणे 2.
फोन : 9822697288
Comments