Posts

Showing posts with the label संघ

हिंदू धर्म टिकवणे.

Image
आपल्या दृष्टीने एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे हिंदूधर्म टिकवणे. त्यासाठी काय काय करावे लागेल? ते करत असताना भाग एक म्हणजे हिंदू संघटन, भाग दोन हिंदू अभिमानाने राहणे, भाग तीन आक्रमणाच्या खुणा मिटवणे. आणि हे सगळं डॉक्टर हेडगेवार यांच्यापासून आता मोहनराव, मोदीजीपर्यंत सगळ्यांनी केले. त्यात आपलाही सहभाग राहिला आहे. संघटन, शक्ती व राजकीय विजय त्या माध्यमातून झालेल्या अनेक कृती या सगळ्यातून बरेच काही फलित आपल्या हाती आले आहे नक्कीच.  आताचा नवा मुद्दा असा आहे की आपण आपल्या डोक्यात ' सिविल वाॅर चा / धर्मयुद्धाचा एक शेवटचा ठोका ' हे घेऊन बसलो आहोत का? तसे असेल तर मात्र आपण थोडसं चुकतोय. हा टप्पा समोरून जर आला तरच या अर्थाने घेण्यास योग्य. पण तो आपल्या डोक्यातला असता कामा नये. कृष्णा नीती या नावाखाली आपण काही भ्रामक कल्पना मनात बाळगून आहोत आणि त्यामुळेच आपण महाभारताप्रमाणे ह्या धर्मयुद्धाची कल्पना करीत आहोत. परंतु कृष्ण निती ला बरेच कांगोरे होते त्यात कृष्णशिष्टाई होती त्यात दृष्टांचा संहार होता सरसकट गल्लीबोळातील युद्ध किंवा नागरी लोकांवर हल्ला असे नव्हते. किंवा कोणीही का...

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संबंध.

Image
मी देखील काही अंशी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराजांच्या  मताप्रमाणेच विचारांचा असल्याने संघाच्या सोबत आहे.  मागे मी म्हणल्याप्रमाणे मला संघाच्या काही गोष्टी पटत नसल्या तरीदेखील  हिंदू धर्म टिकला पाहिजे एवढ्यासाठी देशाला संघ आवश्यक आहे. असे माझे मत आहे.  🌀संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संबंध पार्श्वभूमी : ▶️विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपूर्वी रा. स्व. सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी विहिंप च्या कार्यासाठी महाराजांकडे सहकार्य मागितले.  सर्वधर्मसमभाव मानत असतानाही महाराजांनी याला होकार दिला. 🌀 तेव्हाचे महाराजांचे विचार :  ▶️ तेव्हा ते म्हणाले की ; " मी सर्व धर्माना मानतो. पण याचा अर्थ माझ्या धर्माचा अभिमान मी सोडून द्यावा असा मुळीच नाही. हिंदू धर्माचा गाभाच मुळी मानवता आहे. "