हिंदू धर्म टिकवणे.
आपल्या दृष्टीने एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे हिंदूधर्म टिकवणे. त्यासाठी काय काय करावे लागेल? ते करत असताना भाग एक म्हणजे हिंदू संघटन, भाग दोन हिंदू अभिमानाने राहणे, भाग तीन आक्रमणाच्या खुणा मिटवणे. आणि हे सगळं डॉक्टर हेडगेवार यांच्यापासून आता मोहनराव, मोदीजीपर्यंत सगळ्यांनी केले. त्यात आपलाही सहभाग राहिला आहे.
संघटन, शक्ती व राजकीय विजय त्या माध्यमातून झालेल्या अनेक कृती या सगळ्यातून बरेच काही फलित आपल्या हाती आले आहे नक्कीच.
आताचा नवा मुद्दा असा आहे की आपण आपल्या डोक्यात ' सिविल वाॅर चा / धर्मयुद्धाचा एक शेवटचा ठोका ' हे घेऊन बसलो आहोत का? तसे असेल तर मात्र आपण थोडसं चुकतोय.
हा टप्पा समोरून जर आला तरच या अर्थाने घेण्यास योग्य. पण तो आपल्या डोक्यातला असता कामा नये.
कृष्णा नीती या नावाखाली आपण काही भ्रामक कल्पना मनात बाळगून आहोत आणि त्यामुळेच आपण महाभारताप्रमाणे ह्या धर्मयुद्धाची कल्पना करीत आहोत. परंतु कृष्ण निती ला बरेच कांगोरे होते त्यात कृष्णशिष्टाई होती त्यात दृष्टांचा संहार होता सरसकट गल्लीबोळातील युद्ध किंवा नागरी लोकांवर हल्ला असे नव्हते. किंवा कोणीही कायदा हातात घेऊन वाटेल ते करणे असे नव्हते. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
आणि म्हणूनच प. पू. मोदींनी जी वेगवेगळी कारवाई केली त्यात अनेक मर्यादा सांभाळल्या.
प. पू. मोहनराव वारंवार परस्पर सौहार्द हा विषय मांडत आहेत. त्याच्यातून त्यांचं म्हणणं असं आहे की आपण कुठल्याही पद्धतीने दुसऱ्या टोकाला जाऊ नये. आणि अर्थातच ते सिव्हिल वॉर वगैरे होऊ नये हे आहेच.
जेव्हा संघटनेची / हिंदूंची शक्ती आज एवढी आहे, जेव्हा सरकार आपल्या ताब्यात आहे तेव्हा आपल्याला त्या सिविल वॉरच्या, सरसकट हल्लाबोल या टोकाला जावं लागणार नाही अशी तरतूद नक्की करता येईल.
या सगळ्याच्या व्यतिरिक्त एक विषय शिल्लक राहतोय तो आहे संख्येचा.
लोकसंख्या वाढीच्या माध्यमातून आपला देशच काय पण सगळे जग पादाक्रांत करायला ते निघालेत. त्यावर आत्ता तरी लोकसंख्येचा विस्फोट न होता मिळणारे असे छानसे सोल्युशन दिसत नाही.
त्यातल्या त्यात एका जोडीने तीन नव्हे पण दोन अपत्य एवढे तरी करणे हा एक छोटा उपाय आहे. शिवाय समान नागरी कायद्याच्या माध्यमातून त्यांचे लोकसंख्या नियंत्रण करण्याचा प्रयत्न करता येईल?
विचार करून सांगा तुमचे मत.
आपला वैद्य प्रसाद फाटक. पुणे.
9822697288
Comments