जाती द्वेष नको. क्षत्रियांबद्दल आम्हाला अभिमान आहे.

आपण जाती बद्दल कधीच बोलत नव्हतो. इतके वेगवेगळ्या जाती चे मित्र झाले पण कधी कोणाला जात विचारली सुद्धा नाही.
 पण गेल्या काही काळात काही विशिष्ट कारणाने जातीचे उल्लेख करावे लागले.
आधी मानवते चा भाग म्हणून दलितांची बाजू घेतली आणि नंतर अशी परिस्थिती आली की ब्राह्मणांची पण बाजू घ्यावी लागली.
 त्यामुळे मला थोडंसं असं वाटायला लागले की आपण फक्त मराठा यांच्या बाजूने फारसं बोललो नाहीये.
 ■ खरं म्हणजे मराठा, क्षत्रिय हा समाजाचा रक्षणकर्ता. त्यातीलही मुकुटमणी आमचा लाडका शिवाजी राजा हा हिंदूंचा त्राता.. असे अनेक मुद्दे पूर्वी मांडलेले होते. पण हल्ली या सगळ्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणात त्यांच्या बाजूने फारसं बोललं गेलं नव्हतं...
....पण आज नेमकं असं घडलं - दोन मित्रांची चर्चा चालू असताना एकाने मराठ्यांबद्दल अनुदार उद्गार काढले.
ते कुणालाच रुचणारे नव्हते. पण मी मात्र त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. 
या लेखनामागे २ हेतु असे आहेत -
१ ● आपण मराठा विरोधी नाही. आपल्याला देश रक्षण करणाऱ्या क्षत्रियांचा अभिमान आहे.
२ ● जातीनुसार आता बर्याच व्यक्ती ती जुनी जातीनिहाय कामं करत नाहीत. तरी देखील आपल्या मनातील जात काही जात नाही. पण निदान दुसऱ्याच्या जातीचा उपमर्द कधीच कोणाकडून होता कामा नये याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

Hypothyroid ayurvedic treatment, hypothyroid cure, Hypothyroidism treatment and cure by ayurveda in some cases.हायपोथायरोइड आयुर्वेदिक उपाय या इलाज