सौहार्द हेच सर्वात जास्त हितकर आहे.
■ दरवर्षी मला हा अनुभव येतो - काही बांधव दिवाळीच्या शुभेच्छा देतात किंवा वर्षभरात कुठल्यातरी हिंदू सणाच्या शुभेच्छा देतात.
● या व्यतिरिक्त आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतोच की काहीजण गणेशोत्सवात गणेशाचे किंवा खेडेगावामध्ये देवाच्या पालखीचे पूजन करत सहभागी होतात किंवा माझा एक पेशंट तो नोकरी करत असलेल्या ठिकाणी दर गुरुवारी दत्ताची पूजा करतो.... अशी पुष्कळ उदाहरणे आढळतात.
● मुद्दा असा आहे की आपला संवाद चालू असणे गरजेचे आहे. प्रत्येक जणच अगदी दुसऱ्याच्या धर्माचा अनादरच करतो असे काही नाही.
■ माझ्या त्यांच्याशी होत असलेल्या संवादात काही मुद्दे येतात - प्रार्थना करा, इमानदारी पाळा.
● पण पुस्तकात लिहिलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा पाळायलाच हव्यात असं नाही. आम्ही पण तशा पाळत नाही.
● कुठल्याही नावाने ओळखा; पण ती शक्ती एकच आहे. तुम्हाला त्या शक्तीला जे म्हणायचं ते म्हणा आणि दुसऱ्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या
● धर्म प्रजा धारण करतात. भंजन न्हवे. सर्व जग आपल्या धर्माच्या छत्राखाली आणण्याची काही एक गरज नाही. त्यातून कुठल्याही प्रकारचा लाभ जगाला होणार नाही. उलट युद्ध व अशांतता वाढेल.
● ज्यांनी पूर्वी आक्रमणं, रक्तपात, धार्मिक हल्लेखोरी केली त्यांची तळी उचलणे, त्यांना आदर्श मानणे हे योग्य नाही.
ॐ☪︎ आणि अनुभव असा की; या सगळ्या गोष्टी स्वीकारणारे काही जण मला भेटतात. ☺️🙏
Comments