Posts

Showing posts with the label वर्तन

हिंदुत्वाचे वारे की वावटळ?

Image
हिंदुत्वाचे वारे की वावटळ? ■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.  ● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते. ● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे. ● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे. हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे....

तिघांचा आशिर्वाद.

Image
माझ्या क्लिनिकच्या वेटिंग रूम मध्ये कायम वास्तव्य असलेले तीन.... माऊलीच्या अलीकडे पलीकडे काहीही ज्ञान नाही.... तुकोबाच्या भक्ती ला जगात तोड नाही.... आणि सर्व धर्मांचे मूळ स्थान म्हणजे फक्त माणुसकी... ✴️ माणुसकी सर्व धर्मांच्या वर आहे. मानवतेमुळेच धर्म निर्माण झाले. कसे ते पहा: ■ सुरुवातीच्या काळात आपण प्राण्यांसारखे जगत होतो. मग आपल्या मेंदू, भावना आणि विचारांमुळे आपण वाढू लागलो. आपण चांगले मानव व्हावे अशी आमची इच्छा होती. दुसरा कोणताही प्राणी एक चांगला कुत्रा किंवा चांगली चिमणी होण्याचा विचार करत नाही! याउलट स्वार्थी हेतूंमुळे कधी कधी आपण प्राण्यांपेक्षाही वाईट बनतो. या दोन्ही कारणांसाठी देखील मानवतेच्या विचारांची च गरज आहे. ■ वेगवेगळ्या संस्कृतींनी आणि वेगवेगळ्या धर्मांनी लोकांना चांगले मानव बनवण्याचे काम हाती घेतले. यावरून प्रथम काय आहे ते स्पष्टपणे दिसतेच आहे! काही धर्म उत्कृष्ट असू शकतात आणि काही त्या कामामध्ये उत्कृष्ट नसतीलही. पण उद्देश तोच आहे. ■ उलट पक्षी असे ही घडते आहे की धर्मात काही चुकीच्या गोष्टी, प्रथा देखील आहेत. त्या नीट कराव्या लागतील.  मानवता हा असा आधार आहे की ज...

तीन चित्रांमध्ये मानवतेची दोन अंगे.

Image
मानवतेची दोन अंगे आहेत. ● १. एक अंग म्हणजे चांगले असणे, वागणे - पहिल्या चित्रात त्याचे एक उत्तम उदाहरण आहे -  मल्टी टॅलेंटेड स्वानंदीचा युट्युब चॅनेल व त्यावरील कमेंट्स. One World. ● २. दुसरे अंग म्हणजे सर्व सीमा पार करून, भेदाभेद मनात देखील न आणता एकत्र येणे, खेळणे व मैत्र जुळणे. [ माझा   मुलगा या दुसर्‍या चित्रात आहे; ही गोष्ट मला अभिमानास्पद आहे. 😊 ]  Won world another angle -  ● ३. तिसऱ्या चित्रात तुम्हाला दिसेल की स्वामी विवेकानंद ब्रिटिशांबद्दल काय म्हणाले होते. ते म्हणतात की; " माझ्या मनात ब्रिटिशांबद्दल अत्यंत घृणा होती ; मात्र त्यांना भेटल्यानंतर माझे पूर्ण मतपरिवर्तन झाले. मी त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतो ! " राज्य करणारे क्रूर ब्रिटिश म्हणजेच सर्व ब्रिटिश नव्हेत हे त्यांच्या लक्षात आले. Don't count people in plurals हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. धन्यवाद.  🙏