अत्त दीप भव । तन्नो दंती प्रचोदयात । ये है बुद्ध मार्ग और गणेश मार्ग

*स्वयं प्रकाश. आपला टॉर्च आपल्या हाती* जय गणेश भगवान. बुद्धम् शरणम् गच्छामि । तन्नो दंती: प्रचोदयात ( इश्वर से हम ज्ञान के साथ अपने दिमाग को रोशन करने की प्रार्थना करते है ) अत्त दिप भव ( प्रत्येकानं स्वयंप्रकाशित व्हावं ) धर्मांतरी मत मतांतरे भरपूर असतात परंतु काही मूलगामी विचार सारखे येतात त्याची ही २ उक्ती म्हणजे उदाहरणे आहेत. आपण इश्वरकृपेने ज्ञान घ्यावे. विविध मार्गांनी घ्यावे. त्यातले चांगले वाईट योग्य अयोग्य निवडावे. ज्याला नीर क्षीर विवेक म्हणतात. आणि मग स्वतःच्या प्रकाशात वाट निवडावी आणि चालावी. दुसर्याने टॉर्च धरला की घोळ होणारच तो त्याला पाहिजे तिकडे फोकस मारणार आणि दिशाभूल होणार. म्हणून इथे आपण मानवतेचे फक्त ठराविक मुद्देच मांडतो. का ? कशासाठी ? कसे ? इतकेच. अखंड संहिता नाही लिहीत. फक्त ज्याने प्रेरणा मिळेल इतकेच मांडायचे. बाकी अत्त दिप भव 😊🙏