लठ्ठपणा विषयी उपयुक्त माहीती चा लेख.
लठ्ठपणाचा संपूर्ण विचार : obesity / fat body / स्थौल्य / जाडी वाढणे / वजन वाढणे.. हे सगळे शब्द आपल्या सगळ्यांच्या बोलण्यात / चर्चेत सतत येत असतात. लठ्ठपणा ही एक मोठी समस्या असल्यामुळे त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. वस्तुतः स्थूलता ही काही खूप मोठी समस्या आहे असा काही भाग नाही. कारण जाड असला म्हणजे अनफिट आणि बारीक असला म्हणजे फिट हे सुद्धा तितकसं बरोबर नाही. परंतु आयुष्यात पुढे लठ्ठपणामुळे काही गोष्टी मागे लागून आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतात त्यामुळे फार लठ्ठ होऊ नये , झाला असले तर राहू नये हे अगदी नक्की. आम्ही केशव आयुर्वेदिक चिकित्सालयातर्फे पूर्वी लठ्ठपणा वरती काम सुरू केलं त्याच्यामध्ये आयुर्वेदाप्रमाणे निदान, सल्ला व चिकित्सा असं सगळं केलं. काही पंचकर्माचा भाग देखील करत असू. पण नंतर लक्षात आलं की एवढं काही पुरेसं नाहीये.....म्हणजे पंचकर्म वगैरे केलं की बारीक होतं असेही काही नाहीये; मग उगीच खोटं सांगून पैसे कशाला मिळवायचे? म्हणून मग आम्ही त्यावर काम करतो हे सांगणं बंद केलं. मात्र रोजच्या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला लठ्ठपणाचा विचार करावाच...