Indian Democracy facts. भारतीय लोकशाही चे वास्तव आणि उपाय
भारतीय लोकशाही ची सध्याची अवस्था :
आज आपल्या लोकशाही ची अवस्था अतिशय बिकट आहे. म्हणजे असं की ती काही अगदी पाकिस्तान सारख्या अवस्था झालेली नाहीये हे नक्की. त्यांच्यापेक्षा नक्कीच बरे आहे; परंतु लोकशाही ज्या पद्धतीची हवी त्या पद्धतीची ही नाही. आपण जरी कितीही स्वतःची पाठ थोपटून घेतली तरीही लोकशाही आदर्श लोकशाही नक्कीच नाही हे सगळ्यांना माहिती आहे.
तर ह्या लोकशाहीमध्ये 52 सालापासून ज्या प्रकारच्या घटना घडल्या त्याच या सगळ्याच्या मुळाशी आहेत. जर आपण काही पाश्चात्य उदाहरणे घेतली- उदाहरणार्थ इंग्लंड तर त्या ठिकाणी एकदा हुजूर पक्ष आणि एकदा मजूर पक्ष अशा प्रकारचं शासन बदलत असतं. अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक यांच्यामध्ये शासन बदलत असतं. अशाच प्रकारे तुम्हाला आणखीनही काही पाश्चात्य देशात दिसेल. त्याच्या मागे त्यांचे तपश्चर्य आहे. आपल्याकडे तपश्चर्या करण्याऐवजी स्वातंत्र्यलढ्यात कार्य केल्याबद्दल जे काही एडवांटेज मिळालं त्याचा दुरुपयोग करून ती सत्ता कायम आपल्या हातात ठेवण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या. काही उदाहरणे देतो : मी स्वतः 45 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि मी स्वतः बरेच काही पाहिलेल आहे. 1.फिजिकली एलिमिनेट म्हणजे संपवणे 2. विरोधी उमेदवाराला पळवून नेणे 3.लोकांना प्रलोभाने दाखवून वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी देऊन आपलेसे करून घेणे 4. लोकांवर देखील दडपशाही करणे. अशा प्रकार ची लोकशाही ही सुरुवातीपासून च राबवली गेली. आणि त्यामुळे साठ वर्षे एकाच पक्षाच्या हातात सत्ता राहिली. विरोधकांना बोलायला खऱ्या अर्थाने संधीच नव्हती आज तुम्ही काहीही ओरडा; पण एवढा प्रत्येक जण जर ओरडतोय त्या अर्धी विरोधी बोलायला संधी आहे.
अशा प्रकारे लोकशाहीच्या मुळावरतीच घाव बसलेला आहे. त्यामुळेच ठाकरे साहेब असं म्हणत असत की ही लोकशाही नसून ठोकशाही आहे. आज देखील हे लोकशाही खराबच पद्धतीची आहे. हा आदर्श नव्हे. आता जी लोकशाही आहे आणि ज्या प्रकारे सत्ता पक्ष वागतोय तो आदर्श नव्हेच. परंतु योग्य प्रकारचे आदर्श साधन सोडून ची जी वागणूक आत्ताच्या सत्ताधीश पक्षाने लोकांनी स्वीकारली त्यात त्यांचे नैराश्य होते. कधीच सत्ता मिळणार नाही आणि लांगुल चालना चा अतिरेक होईल या भीतीने त्यांनी अयोग्य मार्ग अवलंबले. आज आपल्या हातात काही राहिलेले नाही असे वाटू लागते परंतु मार्ग नक्की निघेल.
यावर मार्ग काय आपण सुचवा
भारतीय लोकशाही ची अवस्था कशी सुधारावता येईल ?
दोन दिवस केलेल्या चर्चेनंतर हा शेवटचा भाग : लोकशाहीची अवस्था सुधारण्यासाठी तीन गोष्टी करता येतील असे मला वाटते. 🧡एक म्हणजे - सर्व पक्षांकडून निवडणुकीपूर्वी जे पैसे अथवा जेवण अथवा ताटे अथवा सोन्याचे वळे अथवा सोसायटीचा अंतर्गत रस्ता, पेंटिंग अथवा ड्रेनेज करून घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबवणे.
काही जण असे म्हणतात की आम्ही याचे पैसे घेऊन त्याला मतदान केलं. परंतु तुम्ही याचे पैसे घेतले की तो कुठून तरी काढत असतो. कुठला राजकारणी निवडणुकीत पडला म्हणून सगळा बरबाद झाला आणि निघून गेला असं माहिती आहे का ? तसं होत नाही. ते कुठून तरी वसूली करतातच. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं धन अथवा इतर इनकाईंड गोष्टी घ्यायच्या नाहीत
🩷आणि मग दोन म्हणजे - त्यांच्यावर चाप बसवायचा. जे लोक तुम्हाला लाच देऊन निवडून आलेत त्यांना सुनावण्याचे तुमचे हक्क कमी होतात. चाप बसवणे म्हणजे केलेल्या कामाची चौकशी करणे वगैरे अनेक प्रकारे करता येईल.
❤️आणि तीन म्हणजे - आपल्या आवडत्या लाडक्या पक्षाला आपण काही रुपये निधी देणे. सुप्रीम कोर्टाने गुप्तधनाला बंदी घातली ते उत्तम केले परंतु एक म्हणजे धन वाटपाची आजची गरज संपवण्यासाठी कोर्ट काहीही करू शकत नाही दुसरे म्हणजे त्यांना जे इतर खर्चा साठी जे पैसे लागतात ते चांगल्या मार्गाने जर मिळायचे असतील तर ते लोकांनी दिले पाहिजेत. तुम्ही तुमच्या तुमच्या आवडत्या पक्षाला पैसे द्या आणि मतही द्या.
हे सर्वांनी करायचे आहे.
💞💓अशी तिहेरी आपल्याला उभी करता येईल काय ?
Comments