राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संबंध.
मी देखील काही अंशी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराजांच्या मताप्रमाणेच विचारांचा असल्याने संघाच्या सोबत आहे. मागे मी म्हणल्याप्रमाणे मला संघाच्या काही गोष्टी पटत नसल्या तरीदेखील हिंदू धर्म टिकला पाहिजे एवढ्यासाठी देशाला संघ आवश्यक आहे. असे माझे मत आहे. 🌀संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संबंध पार्श्वभूमी : ▶️विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपूर्वी रा. स्व. सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी विहिंप च्या कार्यासाठी महाराजांकडे सहकार्य मागितले. सर्वधर्मसमभाव मानत असतानाही महाराजांनी याला होकार दिला. 🌀 तेव्हाचे महाराजांचे विचार : ▶️ तेव्हा ते म्हणाले की ; " मी सर्व धर्माना मानतो. पण याचा अर्थ माझ्या धर्माचा अभिमान मी सोडून द्यावा असा मुळीच नाही. हिंदू धर्माचा गाभाच मुळी मानवता आहे. "