धर्म, गणपती, हिंदू, मुस्लिम...compilation of thoughts about religions.

* धर्मासंबंधी चार वेगवेगळ्या विचारांचे स्फूटलेखन - 
* एकाच पोस्टमध्ये देत आहे.
■ 1
सलीम खान आणि गणपती : 
सलीम खान यांनी असे सांगितले की; " त्यांची पत्नी महाराष्ट्रीयन असल्याने घरी गणपती बसविण्यास सुरुवात झाली. पुढे मी पत्रकारांना घरच्या उत्सवाचे चित्रीकरण करण्यास परवानगी दिली. याचे कारण म्हणजे मला हेच दाखवून द्यायचे होते की; प्रत्येक मुसलमान हा मूर्तीभंजक, जिहादी, आतंकवादी वा दुसऱ्याच्या धर्माची विटंबना करणारा नसतो. "
● यावर प्रतिपक्षाचे म्हणणे असे की; ' पण आम्ही सरसकट विश्वास ठेवू शकत नाही. '
● हिंदूंनी समजून घेण्याची गोष्ट अशी की; सलीम, प. सुलताना अशी यादी काढत गेले तर पुष्कळ होते.
 मुस्लिमांनी समजून घेण्याची गोष्ट अशी की; त्यांनी पुढे येऊन अशा काही गोष्टी करायला हव्यात की; ज्यामुळे विश्वास व सौहार्द निर्माण होईल.
■ 2
हिंदू आणि गणपती:
अशी अनेक उदाहरणे दिसतात की; खूप देव देव करणारे हिंदू देखील नीट वागत नाहीत.
● त्याबद्दल माझे निरीक्षण असे आहे की; केवळ देव देव करून किंवा वाचन करून धर्म अंगात मुरत नाही. त्यासाठी स्वतःच स्वतःवर काम करावे लागते. आणि तसे काम केले तरी त्याच्या यशस्वीते बद्दल मर्यादा असतातच. 
नामदेव महाराज यांनी म्हटलेच आहे की; ' " नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी
एक तरी ओवी अनुभवावी "
■ 3
हिंदू हा एक धर्म आहे:
हल्लीच काही थोरामोठ्यांनी असे मत मांडले आहे की; ' हिंदू हा धर्म नसून संस्कृती आहे.'
● त्यावर माझे म्हणणे असे की हिंदू हा एक धर्मच आहे. कारण तो प्रजेचे धारण करतो. 
जो वेदांना मानतो व ईश्वरावर विश्वास ठेवतो तो विचार, आचार व कर्म म्हणजे सनातन धर्म. आजचे हिंदू देखील वेद व ईश्वर मानतात. त्यामुळे हिंदू हे त्याच सनातन धर्माचे नवीन नाव आहे. लवचिकतेमुळे नास्तिक व्यक्ती देखील हिंदू राहू शकतो; हे हि नवीन नाही. चार्वाका ला कि जो नास्तिक शिरोमणी म्हंटला जातो; त्याला देखील आपल्याकडे प्रमुख दर्शनांमध्ये मान्यता दिली गेली होतीच की.
●4 
आनंद आणि गणपती :
जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा मनोमन  संगीत, निसर्ग आणि ईश्वर चिंतन असा त्रिवेणी संगम केला की काही वेगळाच ईश्वरीय आनंद निर्माण होतो. एरवीच्या भौतिक आनंदांपेक्षा याची पातळी काही वेगळीच / न्यारीच असल्याचे जाणवते. Out of the world म्हणतात तसेच काहीसे असते ते. 
□ आपला विनीत;
 वैद्य प्रसाद फाटक पुणे 2
9822697288

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.