सर्व धर्म समभाव न्हवे सर्वांचा आदर म्हणतात याला.
एका शास्त्रीय संगीताच्या समूहामध्ये ही पोस्ट आली. त्यातला हा भाग मी पुन्हा नीट वाचला. ही आहे दत्ताजी मारूलकरांनी सांगितलेली उस्ताद बडे गुलाम अली खान यांची एक आठवण .
एकाच वाक्यात खा साहेब माँ सरस्वती आणि अल्लाह की मेहरबानी हे दोन्ही म्हणताहेत. मला असं वाटतं हा सर्वधर्मसमभाव नाहीये.ही एक भावना आहे; ज्यात दुसऱ्याच्या भावनांचा आदर केला जातो. ज्याच्यामध्ये दुसऱ्याच्या धार्मिक भावनांचा आदर केला जातो. आणि त्याच वेळेस स्वतःच्या देवाची देखील आठवण ठेवली जाते. हे उत्स्फूर्त आहे. हे ठरवून केलेलं राजकीय विधान नाहीये. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे.
खाँ साहेबांकडून दोन्ही बाजूच्या लोकांना यातून खूप काही शिकण्यासारखा आहे!
Comments