विचारांनी पुष्कळ गोष्टी बदलतात. म्हणून आपण आपल्या विचारांवर काम करायला हवे.

■ विचारांनी पुष्कळ गोष्टी बदलतात; म्हणून आपण आपल्या विचारांवर काम करणे खूप गरजेचे आहे.

1● व्यक्ती जीवनात विचार :
चांगला विचार केला की चांगली ध्येय दिसू लागतात आणि त्यांच्या प्रभावाने प्रेरित होऊन माणसं जीवनात यश, सुख व समाधान मिळवतात. दुर्विचारी माणसे सुद्धा हल्ली यशस्वी होताना दिसतात पण त्यांची कृत्ये त्यांना सतत काळजीत ठेवतात. एक फार मोठा यशस्वी गुंड होता तो मारला गेला. दुसरा आणखीनच यशस्वी होता तो पुढारी झाला पण घराबाहेर पडताना त्याला भीतीच्या छायेखाली खूप काय काय करावे लागायचे असे कळले. कुणाला ED तर कोणाला कसली भीती. त्यापेक्षा सामान्य माणूस खूप सुखी.
2 ● देशाच्या जीवनात विचार :
हिटलर एका देशाला स्वाभिमानाने जगण्यास घेऊन गेला खरा पण पुढे विचार घसरले आणि सर्वनाश झाला. पुढे जर्मनीला सावरायला तर वेळ लागलाच पण अजूनही जखमा पूर्ण भरल्या असे म्हणता येणार नाही.
3 ● धर्म जीवनात विचार :
अनेक मुस्लिम विचारवंत देखील सांगतात की भारत पाक आदि अनेक देशातील मदरसे जिहादी शिकवण देत आहेत त्यातून वाढणारा आतंकवाद निम्म्या जगात अशांतता माजवतोय. गैर मुस्लिम तर भोगत आहेतच शिवाय पाकिस्तान अफगाणिस्तान आदी देशांत मुस्लिमही कंगालपणा.भय अस्वस्थता सहन करत जीव मुठीत धरून जगत आहेत.
ब 卐 भारतात हिंदू साठी हे आहे की धर्म टिकवायला पाहिजे. मात्र मुस्लिमांशी वरीलप्रमाणे संवाद हवा. समूह द्वेष नको, गृहयुद्ध नको. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. संघटन जागरूकता, मुस्लिम संवाद, कायदेशीर कारवाई हेच मार्ग आहेत. हे विचार ठेऊन हिंदूंनी पुढे जायला हवे.
4 ● चान्गला विचार करणारे समूह :
याविरुद्ध म्हणजे जपान पूर्वी सतत चीन वर आक्रमण v अत्याचार यात मशगूल होता पण आता त्या देशात व्यक्तिपासून ते देशापर्यंत सर्व पातळ्यांवर उत्तम ध्येय घेऊन चालल्याने ते शांत ( इकेगाई ) व समृद्ध देश बनत आहेत. फिनलैंड आहे न्यूझीलंड आहे. हे जगतातले अभ्रष्ट, स्वच्छ व आनंदी देश बनलेत.
  ☆ विभिन्न स्तरावर असे विचार बनवितात किंवा बिघडवतात.
आपल्याला चांगले जग बनायचे असेल तर आधी व्यक्तिगत पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत सर्व पातळ्यांवर विचार सुधारण्या ची म्हणुनच तीव्र गरज आहे. मानवता हा त्यासाठी एक चांगला बेस आहे. करूयात का तो भक्कम?

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

Hypothyroid ayurvedic treatment, hypothyroid cure, Hypothyroidism treatment and cure by ayurveda in some cases.हायपोथायरोइड आयुर्वेदिक उपाय या इलाज