Manoj Shinde

मनोज शिन्दे
ज्या गुरुवारातल्या बावन बोळात गोपि भेटला त्याच बावन बोळातल्या चिखलात मनोज शिन्दे नावाचे एक कमळ उगवताना मी बघितले.इन्दिराजीनच्या हत्येच्या काळात जेव्हा मी तिथे शाखेच्या कामासाठी गेलो तेव्हा हा महाविद्यालयात शिकत होता. हा क्वचित कार्यक्रमाला वगैरे येत असे. तो काही फार रोज शाखेत येत नसे. पण तिथे एकुण तरुण वर्ग फारसा सन्घाजवळ येत नसल्यने मी त्याच्या कडे नेहेमी येवु जावु लागलो. मध्यम उन्चीचा, वर्णाला काळा,काहिसा स्थुल आणि ढगळ कपड्यातला मन्या बघितल्यावर त्याचा कोणताहि प्रभाव पडत नसे.बहुधा कधी केसानाहि कन्गवा लागत नसावा. त्याचा फारसा काही उपयोग नाहि असेच सर्वान्चे मत होते. पण मी मात्र त्याला सोडायचे नाही असे ठरवले.
आणखी एक विशेश बाब आठवते ती म्हणजे त्याला एक अतिशय सुन्दर बहीण होती;कि जिला माझ्याबद्दल थोडे आकर्षण देखील असावे.मला प्रचारक म्हणुन जायचे असल्याने मी तो विषय पुढे वाढू दिला नाही."इथे सुरु होण्या आधी सम्पली कहाणी”.
मन्याची थोडी फार मदत झाली असेल नसेल तोच माझी बदली झाल्याने त्याचा शाखेत येण्याचा विषय सम्पला. पण कारणपरत्वे सम्बन्ध ठेवल्याने ओळख टिकून राहिलि.तो graduate झाला. मी देखील ९१ साली स्वतःचा दवाखाना सुरु केला. तेव्हा पासुन आज तागायत जे मित्र माझ्याकडे येत आहेत त्यापैकि मन्या एक होवुन गेला.
पुढे मन्या देखील ST त नोकरीला लागला. वरकमाई असलेल्या post वर असला तरी ५ पैसेदेखील खाण्याचा त्याचा पिन्ड नसल्याने नोकरित तशी त्याची कुचम्बणा होत असे. पण कामगारान्शी मात्र त्याचा सम्बन्ध येत असे. आणि त्यान्ना मात्र याची पुर्ण मदत असल्याने त्त्यान्च्यात तो लवकरच लोकप्रिय झाला.अतिसामान्य कामगाराचे हाल त्याला पहावेनात. शिकलेल्या माणसाची जी जी म्हणून गरज त्यान्ना असे ते ते काम हा union member नसून देखिल करून द्यायचा."डाक्टर,वेळेला जिवाला जिव देनारी मानस आहेत ही!’ आपली खाली घसरणारी pant वर ओढत तो म्हणाला होता. त्यावेळी त्याचा चेहेरा आनन्दाने भरून गेलेला मी पाहीला. Pant वर ओढून झाल्यावर त्याने आपले बोट माझ्याकडे रोखलेले असायचे."तुमचा काय बी problem असूद्या येणारच धावून" शिकला असला तरी मन्याने आपल्या भाषेला फारसा बामणी वास लागु दिला नव्हता.
st तल्या एकाचे काम फार चान्गले होते, तो स्वतःच्या खर्चाने काही अनाथ अपन्ग मुलाना साम्भाळायचा. त्याला मधेच पैशाची गरज भासे मग मन्या आधि आपला खिसा साफ़ उलट करणार मग इतर ४ जणान्पुढे हात पसरणार आणि त्याची गरज भागवणार ! आणि असे अनेकदा व्हायचे, तरी विना तक्रार तो करी,"आपुन काहि करू शकत नाही निदान त्याला बिचार्याला तरी मदत करावी नाहि का?"
अस म्हन्टल तरी तो काहीच करत नाही हे काहि खरे नव्हे.तो अण्णान्चा परम भक्त, सत्सन्गाला जाणे, वहीत गणपतिचे नाम त्यान्नि सान्गितल्यप्रमाणे लिहून काढणे याच बरोबर अण्णान्च्या मुश्टिधान्य योजनेसरख्या अनेक योजनामध्ये याचा निश्ठेने सहभाग असे."अण्णानी सन्गितलय डाक्टर, तुम्ही काही काळजी करु नका.अण्णा म्हनलेत मी सगळ बदलून टाकणार आहे!" देशाच्या स्थितिवर होणार्या चर्चेला त्याच्या कडे चोख उत्तर होते! खरच असा अढळ विश्वास असणारी माणस आज किति सापडतील? त्याने दिलेलि तारीख आता उलटुन गेलि आहे पण तो नवी तारीख नक्कि देणार आणी परिवर्तन तर होणारच
मन्या स्वामीसमर्थाना गेल्याशिवाय घरी कधीच येत नसे.त्यान्च्यावर पण त्याची अपार श्रद्धा! आधि दर्शन मगच प्रापन्चिक कामे.
हाच मन्या कामगारान्च्या हितासाठी चक्क एक कुख्यात गुन्डाकडे गेला त्याची union st त आणली.मग कित्येक दिवस तो भाइन्च गुणगान करीत असायचा,"भाइन्चा दरबार असतो तिथून कोणि विन्मुख जानार नाहि.कुनाची बायको नान्दत नाही कुनाला नवरा मारतो, १० मिनिटात त्याला हजर करनार कि लगेच तित्थच फ़ैसला!” हे सान्गताना त्याचा चेहेरा असा काही चमकत असे! मन्याशी वाद घालण्यात काही अर्थ नसे."भाइ पुण्याला येणार म्हन्टल कि ५ लाख रु.खर्च असतो" मन्या सान्गत होता ”५ लाख?!" मी वेडाच व्हायचा बाकी.''security केवढी लागते काही idea? पुन्हा मधेच भाइ गाडी बदलतात. आणि भाइन्चा एक dummy त्यान्च्या गाडीत जातो!" तो सान्गत रहायचा. मी म्हणे ’अरे ही security system आपल्या police ना कळवली पाहिजे निदान PM तरी सुरक्शित रहातील!" "अहो आता भाइच मन्त्रि होतिल मग बघा" खरच पुढे भाइनि मन्त्रिपदावर उडी मारलिच."आता ५लाख वाचत असतील ना?” माझा बाळबोध प्रश्न! " छे ते काही police सुरक्शेवर अवलम्बुन रहात नाहीत!!" मी clean bold !
दरम्यानच्या काळात मन्याचा सन्सार व्रुक्श छान बहरून आला smart बायको एक गोन्डस मुलगा. त्या मुलाभोवती त्याचा उरला सुरला सगळा वेळ जाउ लागला.काहि झाल कि तोच मुलाला दवाखान्यात घेवुन यायचा.सायकलवर त्यासाठी पुढे खास sit करुन घेतलेले.सान्गावे ते सगळे तो तन्तोतन्त पाळणारच खर्चाची कुरकुर कधी नाही. बायको म्हणाली म्हणुन english medium ला घातला. ओढाताण झाली तरी खर्चाचि आणि बायको कमी शिकलेली असल्याने घरी अभ्यास घेण्याची कधि अडचण मानली नाही. रात्री उशीर झाला तरी स्वतः घेणार!
सगळ छान असले तरी कथा कादम्बर्या काही खोटया नसतात! परिक्शेची घडी आली होति…….
एक दिवस अचानक मन्याचा छोकरा - पिन्टुच वर्तन बिघडायला लागल्याच जाणवु लागल.बाप काळजीत पडु लागला.पिन्टु वेळीअवेळी झोपेतुन उठु लागला. काही बाही चित्रविचित्र बोलु लागला सुरुवातिला वाटल कि काहितरी मुलाचे हट्ट न पुरवले गेल्याने नाराजी असेल.आवडीचे काहीबाही आणुनहि दिले पण मुलगा सुधारेना उलट बिघडतच चालला. काय करावे कळेना.जवळच्या doctor ला दाखवुन झाले. गुण येइना.एकदा तर मी भेटायला गेलो तर तो समोर आहे असे कळले म्हणुन बघतो तर एका छोट्याशा हौदात पिन्टु पोहत होता अणि विमनस्क पणे कपडे घेवुन काठावर मन्या उभा होता "असा तो तास अन तास पोहोत रहातो. एवढा stamina कुठुन आला काय महिति?” मन्याचा चेहेरा बघवत न्हवता.
आता पिन्टु ऒरडा आरडा करु लागला होता.तो घरातुन बाहेर पडायचा वेड्यासारखा भटकत फ़िरत रहायचा.पिन्टुच्या डोक्यावर परिणाम झाला होता.आपण एखाद्याला डोक्यावर पडलास का म्हणुन किति सहजपणे म्हणतो? ज्याच्यावर वेळ येते त्याला स्वतःला वेड लागायची स्थिति येते. मन्या मुळापासुन हादरला होता. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता तो मागेपुढे न बघता देत होता. तो आणि त्याची बायको मुलाच्या मागे मागे फ़िरत असत. किति रजा झाल्या त्याला काहि गणतीच न्हवती. रात्री घरी येइ पर्यन्त दोघे अगदि थकुन जात तरी मुलगा झोपु देत नसे. जागरण आणि हिन्डणे चालुच राहिले.डाक्टरी उपाय चालत नसल्याने एकिकडे बाहेरचे बघण्याचा सल्ला मिळाला.त्या नावाखाली फ़सवणुक देखील खुप झाली पैशापारि पैसा गेला गुण मत्र काहिच नाही.एकिकडे घरासाठी कर्ज काढलेले आणि घरहि तब्यात नाही.builder ची दिरन्गाइ दुसरीकडे हि समस्या.
''डाक्टर रोज स्वमीन्शि भान्डतोय माझ्या वाट्याला का हे दिलत? काय चुकले माझे?" तो रडवेला झाला होता "अरे स्वामी परिक्शा बघतात, निघेल काही तरी मार्ग निघेल” मी सान्गण्याचा प्रयत्न करत होतो, पण खरे उत्तर माझ्यापाशी न्हवते.
पिन्टुचा आजार काही वेगळाच होता. हा जपाला बसला कि तो अन्गावर धावुन येइ म्हणे" तु काय माझ्या मुळावर येतो काय?"अण्णाकडे नेला तर त्यान्च्या अत्यन्त तेजस्वि नजरेला खुन्नस नजर देउन बघत होता.मी उपचार करु शकलो नसलो तरी आयुर्वेदात राक्षसजुष्ट नावाचा एक उन्माद सान्गितला आहे तसे काहिसे वाटत होते.shock tretment ला मन्याने स्पष्ट नकार दिला होता ते त्याला सहन होणार न्हवते. आजी आजोबाना पिन्टु फार त्रास देउ लागल्यने मन्या family घेवुन लान्ब कुठेतरि गेला असे कळले.बर्याच दिवसात सम्पर्क तुटला रुख रुख वाटत होती.फोन देखिल लागत न्हवता आणि एक दिवस मन्या येवुन हजर झाला.
त्याच्या चेहेर्यावर विलक्शण आनन्द दिसत होता अ‍ेका नाथ पन्थी साधुने ५ पैसे न घेता पिन्टुला बरे केल्याचे सान्गितल्यावर माझा आनन्द गगनात मावेनासा झाला.आता ते दोघे रस्त्याने भटकताना किन्वा मन्या कपडे साम्भळताना दिसणार नव्हता!
आजारातल्या अफाट खर्चाच्या काळात एकदा मन्या म्हणाला होता "डाक्टर या पोराला या आजारातुन बाहेर काढनार,आम्हाला pension नाही,म्हातारपणी औषधपान्या वाचुन मेलो तरी बेहेत्तर पण हे पोरग अस नाही ठेवनार!"

माझ्या डोळ्यात दाटून आलेली हि आसव बहुधा आनन्दाचि असतील असा अन्दाज आहे! मग लेका तुझे अध्यात्म कुठे गेले? " मित्रानो,स्वतःला झोकुन देउन प्रेम करणारे असे लोक भेटत राहिले तर मी हजार मोक्श कुर्बान करायला तयार आहे.आणि तसहि मुलाला काढुन ठेवलेल्या खिरितला १ चमचा काढुन घेण्याचा मोह होणार्या आपल्यासारख्या पामराना लै जनम घ्यावे लागणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast