My philosophy comes from The Lord Krishna.
आधीच्या पोस्टमध्ये आपण आपली मानवता आणि हिंदुत्व हे कृष्णा चे किंवा कृष्णाने जगलेल्या फिलॉसॉफी प्रमाणेच आहे असे सांगितले.
आता आपले - ' माय लाईफ माय फिलॉसॉफी ' हे तत्त्वज्ञान जे आठ भागात सांगितले तेही कृष्णा कडूनच आले असल्याचे देखील जाणवले. कारण आपण म्हणालो, " जगत भी है और परब्रम्ह भी है ".. आपण भौतिक सुख समृद्धी आणि रोमँटिकता नाकारली नाही. गौण मानली नाही. पण त्याचवेळी परब्रम्ह भगवंताला विसरूनही चालणार नाही असे विचार मांडले.
कृष्ण या सर्व बाबत तशाच प्रकारचे जीवन जगला आहे. तो तर रोमँटिकतेचा महाराजाच आहे.
{ अर्थात रोमांटिक म्हणजे लैंगिकता नव्हे हे विसरू नका.
रोमँटिक चा खरा अर्थ भौतिक जीवनातील सौंदर्य, नात्यांमधे असलेले प्रेम व गोडवा, जगावर करण्याचे प्रेम असा अनेक अंगी होतो. }
Comments