उन्हाळा आला महाबळेश्वर ला चला

Repost. 
Read if you missed it and *re read if you read it.* 
It is soul soothing kind one : उन्हाळा आला की मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागायच्या म्हणून आपली ट्रिप देखील उन्हाळ्यातच करायची आपल्याला सवय होऊन गेली. टूर्स अँड ट्रॅव्हल्स चां हा काळ. त्यातून पुणे मुंबई नागपूर सारखे ठिकाणा गर्मीने हाहाकार मग काय चला महाबळेश्वर पाचगणी असही असायचं. असाच एक रम्य अनुभव :
( निबंध format )
*तुका म्हणे होय मनासी संवाद* - 
ट्रिपचा नुसता विषय निघाला तरी सगळेजण आनंदित होऊन जातात. मरगळलेले लोक देखील उत्साहाने बोलू लागतात. त्यातून उन्हाळा असेल तर जीवाची काहिली झाल्याने शहरा बाहेर पडण्याची देखील तीव्र इच्छा असतेच. मग जवळच्या जवळ म्हणून महाबळेश्वर-पाचगणी किंवा जमलं तर उटी मनाली अशा अनेक ट्रीप्स आपल्या निघतात. मला आणि माझ्या कुटुंबाला देखील अशा सहलींचे भारी आवड. सहलीला गेलं की मन कसं प्रसन्न होऊन जातं. या सहली मधील अनेक अनुभव सगळी मित्रमंडळी मैत्रिणी लिहितीलच. ते वातावरण अनेक जणांच्या लिहिण्यात येईल दिवसभर ठीक ठिकाणी विशेष पॉईंट्स असतात तिथली गर्दी पाहता हा सर्वांचा आवडीचा विषय कसा आहे हेही कळून येते. पण या सगळ्या वर्णनापेक्षा मी मात्र एक वेगळाच अनुभव आपल्याला सांगणार आहे. दुपारी संध्याकाळी गजबजलेली असलेली ठिकाणे सकाळी मात्र छान पैकी झोपलेली असतात. मग तो समुद्रकिनारा असो की डोंगर-दऱ्या. मला मात्र काय असेल ते असो रात्री उशिरापर्यंत गप्पा टप्पा झाल्या तरी सकाळी जाग येतेच. काहीवेळा लवकर येते काही वेळा फार लवकर देखील येते आणि मग मी तोंड धुतो आणि भटकंतीला बाहेर पडतो. आत्ता लिहिताना मला असे वाटून गेलं की खरंच ट्रीप ला जाताना आमचा शाखेतला दंड आहे तो घेऊन जायला हवं कारण आपल्या गावातल्या सारखेच सर्व ठिकाणी कुत्र्यांचे भू भू चालू असते. असो सागर किनारी हळूहळू वर चढत जाणारा सूर्य असो की डोंगर-दऱ्या तील पक्षांची किलबिल असो,  सकाळी वातावरण आनंदाने भरलेल असत. आपल्याला जाणवत नाही परंतु ही सहलीचे गावात असलेली छोटी मोठे ठिकाने रोज नव्या दिवसाचे खूप मनापासून स्वागत करत असतात तो आनंद या सृष्टी मध्ये भरून आलेला दिसतो. पण ती तो नाचून गाऊन न्हवे तर विलक्षण शांत v प्रसन्न भावाने व्यक्त करते. मी पण मग पिसासारखा हलका होऊन वाट फुटेल तिकडे भटकत जातो आणि मग छान एखाद्या ठिकाणी बसून आपल्या आवडीच्या गोष्टी सुरु करायच्या हा माझा छंद. या आवडीच्या गोष्टींमध्ये डोंगराच्या माथ्यावर एखाद्या दगडावर पाय सोडून दरीच्या कडे तोंड करून प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार करतो शुद्ध हवा फुफुसात पूर्ण भरून घेतो.एरवी मला फार मोठ्याने बोलायला आवडत नाही पण मनात कुठेतरी सुप्त इच्छा असतेच बहुधा की मस्त आवाज करावा. आणि मग काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा एखाद्या देवाचं नाव घ्यायचं किंवा ओमकार करायचा. किंवा भजन म्हणायचं आनंदाची परिसीमा राहत नाही. मग पुन्हा शांत व्हायचं डोळे मिटून घ्यायचे भरपूर श्वास घ्यायचा भरून घ्यायचे आणि हा निसर्ग देणाऱ्याच्या परमेश्वराचे आभार मानायचे. कधी एखादं गाणं म्हणायचं या वातावरणाला साजेसं कधी कानामध्ये हेड फोन लावून मोबाईल मधल गाणं ऐकायचं, त्याचा आस्वाद घ्यायचा.  कधी पक्षी बघायचे कधी पक्षांचा चिवचिवाट ऐकायचा, कधी वेगवेगळे पक्षी बघायला मिळाले की त्याची मजा सुद्धा काही वेगळीच असते आणि गंमत म्हणजे आता त्या दूरवर भुंकणाऱ्या कुत्र्यांची आवाज देखिल कमी झालेला असतो. माणसांची तर अजून साखर झोप चालू असते. त्यामुळे गर्दी गोंधळ यातलं काही नसत. अशा वेळी ध्यान करायचं भगवंताचे आभार मानायचे आणि मग सुरु होतो तुका म्हणे होय मनासी संवाद. ही अवस्था म्हणजे परम आनंदाची अवस्था असते. किती वेळ जातो आणि भगवान सुर्य वर येऊन खुणावायाला सुरुवात करतात मग सकाळची भ्रमंती समाप्त करून मी हळूहळू पावले टाकत पुन्हा आपल्या खोली कडे वळतो. पुन्हा हाच अनुभव कधी मिळेल ह्याचा विचार न करता समाधानी मनाने.
By Vaidya ( dr. ) Prasad Phatak Pune 9822697288

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast