आतंकी हल्ला जातीय तेढ आणि भारत

■ पुलवामा नंतर नुकताच दिल्लीमध्ये मोठा आतंकी हल्ला होऊन दहाच्या वर मानवांची निर्घृण हत्या झाली.  ही गोष्ट खूप संताप जनक आहे आणि त्याचा मी निषेध करीत आहे. ही कृत्य शिकल्या सवरलेल्या भारतातील मुसलमानांकडून झाली यामुळे अधिक संताप येणे स्वाभाविक आहे. 
या पार्श्वभूमीवर गेले बरेच दिवस दोन्ही बाजूंनी भयंकर समूह द्वेष व टोकाचे विचार आतून उकळताना दिसत आहेत हे एक मोठे गंभीर गोष्ट ध्यानात येत आहे.
म्हणूनच आज आपल्याशी हा संवाद साधत आहे.
● केवळ संताप होऊन व एकमेकांवर नाराजी व्यक्त करून काम होणार नाही. यामागे असणारी मूळ कारणे शोधली व त्यावर उपाय केला तर ते जास्ती परिणामकारक ठरेल असे मला वाटते म्हणून हा लेखन प्रपंच.
● विविध धर्मांची रचना माणसाला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी झाली हे खरे असले तरी सर्व धर्म सारखे नाहीत. जशी हाताची पाच बोटे भिन्न तसे वेगवेगळे धर्म ही भिन्न. अत्यंत पुरातन काळापासून अस्तित्वात आलेले हे धर्म असल्याने त्यांच्यात काही गुण व काही दोषही आहेत. धर्मचिकित्सा करून गुण वाढवायचे व दोष कमी करायचे हे आता आपणा सर्वांच्या हाती आहे.
● इस्लाम हा एक धर्म आहे आणि त्यात काही चांगल्या गोष्टी असल्या तरी भारताला अडचणीत आणणाऱीच नव्हे तर जगालाच अडचणीत आणणारी गोष्ट म्हणजे ' जिहाद '. त्यामुळे तो शांतीचा धर्म किंवा संस्कृतीच्या प्रगतीतील भाग असलेला धर्म असून देखील त्यातील खूप काही माणसे अशांत व अमानुष बनली आहेत. जगभरात चाललेल्या आतंकवादी कारवाया व जिथे मुस्लिम नावाला देखील नाहीत अशा ठिकाणी देखील असणारी अशांतता ही त्याची अत्यंत ठळक उदाहरणे आहेत.
■ ' अल्लाह ओन्ली ' हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. अभ्यासकांना हे सहज कळते की सर्व शक्तिमान असणाऱ्याला वेगवेगळ्या धर्मांनी अल्लाह,  गॉड / परब्रम्ह अशी नावे दिली आहेत. त्यामुळे ' अल्लाह ओन्ली ' ही देखील मोठी समस्या नाही. आम्ही देखील ' ब्रह्म एकले ' असेच म्हणतो. खरी समस्या पुढे आहे - अल्लाह या एका नावानेच सर्वशक्तिमान ला ओळखावे आणि जो त्याला मानणार नाही त्याला येन केन प्रकारे संपवावे आणि सर्वांना इस्लाम च्या पंखाखाली आणावे.   ' न मानणारा तो काफिर आणि त्याच्या विरुद्ध पुकारलेले हिंसक युद्ध म्हणजे जिहाद ' - ही सर्वात मोठी समस्या आहे.
 ● असे असले तरी प्रत्येक मुसलमान हा जिहादचे पालन करतो किंवा जिहादला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करतो; असे मात्र मुळीच नाही. नेमकी संख्या सांगता येणार नाही परंतु असे कित्येक मुसलमान आहेत की, ' आपले जीवन आपण शांतपणे जगावे व इतरांना जगू द्यावे. ' मात्र अशा मंडळींचा प्रभाव समाजावर नाही ते उघडपणे जिहादी मानसिकतेला विरोध ही करीत नाहीत. त्यांनी उघडपणे तसे केले तर परिस्थिती नक्कीच पालटणार आहे आणि तसे करण्यासाठीचे आवाहन आपण त्यांना आज पुन्हा एकदा करत आहोत. 
त्यांच्या साईट्सवर जाऊन हे सर्व मोकळेपणाने सांगण्याची कृती देखील मी अनेकदा केलेली आहे. अजूनही करत आहे. माझ्या मनात समूहद्वेष नसल्याने मी असा संवाद सहज करू शकतो. 
त्यांच्यातील अशा जिहाद न मानणाऱ्या लोकांची जर बहुसंख्या झाली तर जगाला  शांतीचा मार्ग सापडेल.
■ तशा लोकांची तीन ठळक उदाहरणे आपण बघूया.
 ● 1 मला दिसलेले दोन अहमद - ते जिहाद मानतच नाहीत, शिवाय जिहादच्या विरुद्ध उभे देखील राहतात.
@ जम्मू-कश्मीर & उत्तर प्रदेश पोलीस. In link 
१. https://youtu.be/RsPhMnqPHLc?si=kzJV2icnef_-zwYc
& २. https://youtube.com/shorts/CuMQFXC8Kjo?si=IIK6_0dAmV0087Br
३. नुकताच गुजरात मधील एका मुस्लिम न्यायाधीश बाईंनी गोहत्या बंदीचा कायदा मोडणाऱ्या काही मुसलमानांना कठोर शिक्षा दिल्याचे उदाहरण आहे समोर आले आहे.
ही उदाहरणे हिंदूंना हे दर्शवतात की सर्वजण जिहादी नाहीत.
 आणि मुसलमानांना हे दर्शवतात की पूर्वी जरी काही लिहिले असले तरी आपण काळानुसार बदलावे, या लोकांचा आदर्श ठेवून पण देखील जिहादला विरोध करावा.
■ आजपर्यंत मुसलमान समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. ही गोष्ट स्पष्ट करणाऱ्या दोन लिंक्स आणि नंतर माझी माहिती देखील समोर ठेवत आहे त्याचाही विचार त्या धर्मातील बांधवांनी व भगिनींनी वरील प्रमाणेच करावा ही विनंती. 
१●  https://share.google/aimode/AlxTud8cuUACDsjA5
 & २●
Islamic modernism - Wikipedia https://share.google/2rIdLYIvRfg8Pc9LF
 या गुगल च्या दोन लिंक आहेत.
● ३ ए आय केलं की झालं असं नाही; म्हणून आणखीन काही उदाहरणे देतो. 
आपल्याकडेही हमीद दलवाई सारखे अनेक लोक होऊन गेलेत.
● ४ आणखी दोन मोठे रेफरन्स आहेत एक म्हणजे खुद्द औरंगजेबाचा भाऊ दाराशुकोह हा काश्मीरला गेला. त्यानी तिथल्या पंडितांची मदत घेतली आणि 50 उपनिषदांची भाषांतरं करून घेतली.
 [ माझी आता अनेक उपनिषदे वाचून झालीत. हिंदूंनो, आपली किती उपनिषदे वाचून झालीत? हे सांगायला हरकत नाही. ]
● ५ अकबराच्या अनेक गोष्टी मला पटत नाहीत. महाराणा प्रताप ला छळणारा अकबर मला प्रिय नाही. परंतु एक गोष्ट नक्कीच आहे की; धर्माच्या बाबतीत त्याने मोठ्या रेफॉर्मचा प्रयत्न केला. त्यानेच दिने इलाही हा प्रागतिक धर्म स्थापन केला होता. ही बाकीच्या त्याच्या वर्तनापेक्षा खूप वेगळी आणि चांगली गोष्ट आहे.
■ सर्वांनी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी : मुसलमानांनी बदलाव आणावेत आणि हिंदूंनी त्यांच्याशी संवाद साधून दुसऱ्या टोकाला न जाता त्यांच्या बदलावला मदत करावी. सर्वांनीच सतर्क रहावे व आतंकवादाला नो टॉलारन्सच्या सरकारच्या भूमिकेला मदत करावी. 
● हिंदू मुस्लिम ऐक्य व्हायलाच हवे असा आग्रह नाही पण टोकाचे भांडण, टोकाचा द्वेष नको उलट सौहार्दाचा मार्ग अवलंबावा. 
■■ यातूनच शांततेचा व समृद्धीचा महामार्ग खुला होईल अन्यथा कधीच न संपणारा अध्याय होऊन बसेल व त्यातून सर्वांनाच नुकसान होईल म्हणून यावर गांभीर्याने विचार करून सर्वांनी आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करावेत ही विनंती. 🙏
आपला विचारप्रार्थी; डॉक्टर प्रसाद फाटक.

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Hypothyroid ayurvedic treatment, hypothyroid cure, Hypothyroidism treatment and cure by ayurveda in some cases.हायपोथायरोइड आयुर्वेदिक उपाय या इलाज

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.